वाडेगाव(डॉ शेख चांद)- वाडेगाव येथील घरकुल लाभार्थ्याचे निवासी अतिक्रमण बाबतचा सादर केलेला प्रस्तावावर दप्तर दिरंगाई करीत त्याचा लाभापासून वंचित ठेवल्याप्रकरणी बाळापुर बि डी ओ तसेच या प्रकरनाशी संबंधित जि. प.व पं. स. स्तरावरील सर्व कर्मचाऱ्यांना कर्तव्यात कसूर केल्या प्रकरणी ताबडतोब निलंबित करून त्यांच्याविरुद्ध गुन्हे नोंदविण्या बाबत तसेच सर्व प्रस्ताव धारकांचे अतिक्रमण त्वरीत नियमानुकुल करुन त्यांना घरकुलाचा लाभ देण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे बाळापुर तालुकाध्यक्ष अॅड सुबोध गणेश डोंगरे यांनी बुधवार २७ नोव्हेंबर पासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषणाला प्रारंभ केला आहे.
वाडेगावातील घरकुल आवास योजने करीता निवड झालेले प्रस्तावधारक बेघर असल्याने अतिक्रमण करून राहतात शासन निर्णयाप्रमाणे घरकुल मिळविण्याकरिता अतिक्रमित जागा नियमानुकुल करून घेणे बंधनकारक असल्याने त्यांनी आपले दस्तावेज ग्रामपंचायतकडे सादर केले होते सदर प्रस्ताव ग्रामपंचायतीने २२ जुलै रोजी पंचायत समिती बाळापूर येथे सादर केले तेव्हापासून सदर प्रस्ताव त्या कार्यालयात धूळखात पडले होते बाळापूर बि डी ओ व त्या प्रकरनावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी जाणीवपूर्वक दप्तर दिरंगाई करीत काहीही कारवाई करण्यात आली नव्हती प्रस्तावधारक हे वर्षानुवर्षे म्हणून हलाखीचे जीवनमान जगत आहेत.
किमान आता तरी त्यांना न्याय देण्यात यावा तसेच दप्तर दिरंगाई करीत कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी संबंधित बाळापुर बि डी ओ व प्रकरनाशी संबंधित जि.प.व प.स. कर्मचाऱ्यांना ताबडतोब निलंबित करावे तसेच अनुसूचित जातीच्या घटकाला जाणीवपूर्वक दुर्लक्षीत करून लाभापासून वंचित ठेवल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम १९८९ नुसार गुन्हे नोंदविण्यात यावे तसेच प्रस्ताव धारकांचे त्वरीत अतिक्रमण नियमानुकुल करून त्यांना घरकुलाचा लाभ देण्यात यावा त्यांना २६ नोव्हेंबर पर्यंत न्याय न मिळाल्यास भारतीय राज्यघटनेने दिलेल्या अधिकारावरून संबंधित प्रकरणात न्याय मिळेपर्यंत ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे बाळापुर तालुकाध्यक्ष अॅड सुबोध डोंगरे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अकोला यांना निवेदनाद्वारे दिला होता मात्र संबंधित विभागाकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्यामुळे बुधवार २७ नोव्हेंबर पासून अॅड सुबोध डोंगरे यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषणाला प्रारंभ केला आहे.