अकोट प्रतिनिधी (देवानंद खिरकर)- अकोट तालुक्यातील लोहारी येथे २७ रोजी वेळ सायं ६ वाजता जि. प. शाळा समोर दरवर्षी प्रमाणे यावर्षीही सुध्दा लोहारी येथे संविधान दिन व महात्मा फुले स्मृतिदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात केला आहे. या आयोजनात राष्ट्रीय किर्तनकार सुप्रसिध्द सप्त खंजेरी वादक सत्यपाल यांचे शिष्य संदीपपाल महाराज यांचे जाहीर प्रबोधन होणार आहे. या आयोजन वंचित बहुजन आघाडी युवक चे तालुका महासचिव मयुर सपकाळ व जय भिम मित्र मंडळाच्या वतीने केला आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष रूपराव म्हैसने व उदघाटन अकोट उपविभगाचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील सोनवणे यांच्या हस्ते होणार आहे.
या कार्यक्रमात प्रमुख अतिथि म्हणून काशीराम साबळे लोहारी चे सरपंच प्रदीप सपकाळ प्रदीप वानखडे, वंचित बहुजन आघाडी चे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे पं. स. चे गटविकास अधिकारी रायबोले अकोट शहर पो. स्टे. चे पोलिस निरीक्षक संतोष महल्ले ग्रामीण पो. स्टे. चे. पोलिस निरीक्षक ज्ञानोबा फड वंचित बहुजन युवक आघाडी चे जिल्हाध्यक्ष सागर कड़ोने, संदीप आग्रे, शैलेश धांडे, हरिभाऊ वाघोडे वंचित बहुजन युवक आघाडी चे जिल्हा उपाध्यक्ष समीर पठान ,राजकुमार दामोदर, सुनीताताई हिरोळे, विनायक भरक्षे, सतीष घनबहादूर ,भूषण घनबहादुर, वंचित बहुजन आघाडी अकोट शहर चे महासचिव मो जम्मू पटेल युवा सामाजिक कार्यकर्ता साजिद खान पठान यांची प्रामुख्याने उपस्थिति राहणार आहे. या जाहीर प्रबोधन कार्यक्रमात मोठ्या संख्याने सहभागी व्हावे असे आवाहन जय भिम मित्र मंडळ लोहारी यांनी केला.