आडगाव बु. (दीपक रेळे)- आडगाव बुद्रुक तालुका तेल्हारा जिल्हा अकोला, येथे पुरातन लाल मारुती संस्थान ची यात्रा दरवर्षीप्रमाणे 16 नोव्हेंबर 2019 रोजी मोठ्या हर्षोल्हासात संपन्न होत आहे. सकाळी पाच वाजता मारुती महाराज ची पूजा विधी करून रथाची पूजा विधी करून सर्व भाविक जण गोळा होऊन संपूर्ण गावातून सकाळी सहा वाजता रथाची मिरवणूक काढतात त्यामागे हजारो भाविकांचा मोठा फौजफाटा असतो. तसेच दुपारी तीन ते चार वाजेच्या दरम्यान दहीहंडी कार्यक्रम होतात. त्यात सर्व भाविक मोठ्या आनंदाने सहभागी होत असतात.
संपूर्ण गावात संपूर्ण गावातील रथाची पूजा विधी झाल्यानंतर दुपारी चार वाजेपर्यंत रथ लाल मारुती संस्थांच्या जवळ येतो. त्यानंतर भजनी दिल्या यांच्या हस्ते रथाची पूजा विधी करून नंतर आरती , गोपाळकाला करून महाप्रसादाला सुरुवात होते. यात्रेत खेड्यापाड्यातून तसे शहरी विभागातून खेळणी दुकान, भांड्याचे दुकान, हे आपली दुकाने घेऊन सदा त्यामुळे यात्रेला वेगळेच रूप प्राप्त होते. तसेच गावातल्या सासरी गेलेल्या मुली यात्रेच्या निमित्ताने गावात आपल्या माहेरी आडगाव येथे येत असतात. संवेदनशील समजल्या जाणाऱ्या आडगाव बुद्रुक येथे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी हिवरखेड पोलीस स्टेशनचे लवांगगडे साहेब यांनी आपला पूर्ण फौजफाटा आडगाव बुद्रुक येथे तैनात केलेला आहे