तेल्हारा(प्रतिनिधी)- स्थानिक जिजामाता नगरमध्ये राहणाऱ्या ३० वर्षीय युवकाने आपल्या स्वतःच्या राहत्या गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली.
शहरातील जिजामाता नगरात राहणाऱ्या विठ्ठल पेटारे ( ३० )या युवकाने स्वतःच्या राहत्या घरात आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी 11 वाजेच्या दरम्यान उघडकीस आली.स्वतःच्या घरात छताच्या लोखंडी पाईपाला दोरी बांधून गळफास घेतला.मृतकाचा भाऊ घरी आला असता सदर बाब त्याच्या लक्षत आल्यानंतर घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाली होती.विठ्ठल हा मोलमजुरी करून उदरनिर्वाह करीत होता मनमिळाऊ असा स्वभाव असलेल्या विठ्ठल च्या जाण्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.मृतक विठ्ठल च्या मागे लहान भाऊ व आजोबा असा परिवार असून आई वडिलांचे छत्र काही वर्षपूर्वीच हिरावल्याने सर्व जबाबदारी ही विठ्ठल याच्यावर होती.तेल्हारा पोलीस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक सुधाकर गवारगुरू व पो कॉ खडसे यांनी घटनास्थळ पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आला आहे.