बेलखेड (चंद्रकांत बेंदरकार): बेलखेड येथे आज १० ऑक्ट रोजी दुपारी 2 च्या सुमारास तेल्हारा आगार बस क्रमांक -एम एच -40 एन-8061 अकोट वरुन तेल्हारा कडे जात असतांना बेलखेड वरून 1 किमी अंतरावर बस चा अपघात वाहक श्री. बाळु चोपडे यांच्या सतर्कतेमुळे होता होता वाचला, चालक व वाहक यांना विचारले असता त्यांनी हा अपघात अतिशय खराब रस्ते असल्यामुळे झाला असल्याचे सांगीतले, बस मध्ये एकूण ४० प्रवाशी असल्याचे सांगितले, यामध्ये २० शाळेतील विद्यार्थी असून यामध्ये २ जण किरकोळ जखमी असल्याचे माहिती त्यांनी दिली.
हिवरखेड ते तेल्हारा हा रस्ता बरेच दिवसापासून खराब झाल्यामुळे या रस्त्यासाठी अनेक संघटना व राजकीय पक्ष यांनी निवेदन व आंदोलन करूनही स्थानिक प्रतिनिधीने रस्त्याकडे दुर्लक्ष केले रस्त्यांचे काम अजून पर्यंत झालेले नाही व यामध्ये ऐन निवडणुकीच्या तोंडावर होत असलेल्या अशा घटनांमुळे मतदारसंघाचे आमदार प्रकाश भारसाकळे यांना जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल एवढे निश्चित.