बोर्डी (देवानंद खिरकर)- महात्मा गांधी जयंती निमित्त शहानुर येथे ग्राम स्वच्छता अभियान तसेच वन्यजीव सप्ताह 2019 निमीत्त विध्यार्थ्याच्या रैलीचे आयोजन नळनाळा वनपरिक्ष्रेत्र अधिकारी कार्यालया तर्फे करण्यात आले. यावेळी शहानुर येथिल जी.प. प्राथमीक शाळेतील विध्यार्थ्यांना वन्यजीव विषयक माहिती दाखविण्यात आली. तसेच विध्यार्थ्यांना वन्यजीव सवर्धनाचे महत्व समजवन्यात आले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी मा.श्री.विश्वनाथ चव्हान यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी वनपाल कु.योगेश्री राठोड, वनरक्षक मा.श्री.प्रदिप राठोड, वनरक्षक कु.भारती जोशी, वनरक्षक मा.श्री.विनोद चव्हान, सर्व वनरक्षक व ईतर कर्मचारी यांनी परिक्षम घेतले.