बाळापूर (श्याम बहुरूपे): येणाऱ्या आगामी नवदुर्गा उत्सवानिमित्त बाळापूर चे ठाणेदार नितीनजी शिंदे साहेब ,ए पी आय पडघन साहेब यांच्या मार्गदर्शनात नवदुर्गा उत्सव मंडळांची बैठक संपन्न झाली या बैठकीला विविध मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. बाळापूर पोलीस निरीक्षक नितिन शिंदे यांनी उपस्थित दुर्गा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना व सदस्यांना दुर्गा उत्सव शांततेत पार पाडवा तसेच जातीय सलोखा कायम ठेऊन दुर्गा उत्सव आनंदात साजरा करावा असे सांगितले . यावेळी जेष्ठ नागरिक नवदुर्गा उत्सव मंडळ पारस, सावजनिक दुर्गा उत्सव मंडळ पारस,शिवभक्त दुर्गा उत्सव मंडळ चिंचोली गणू,नवदुर्गा उत्सव मंडळ सांगवी जोमदेव, बाल गोपाल नवदुर्गा उत्सव मंडळ देगांव, गुरुकृपा मित्र मंडळ बाळापूर, शिवसेना नवदुर्गा उत्सव बाळापूर, शिवदुर्गा उत्सव मंडळ जुने शहर बाळापूर, सार्वजनिक नवदुर्गा उत्सव मंडळ श्रीराम नगर बाळापूर, सावता नवदुर्गा उत्सव मंडळ कासारखेड बाळापूर, महाकाली नवदुर्गा उत्सव मंडळ वाल्मिक नगर बाळापूर,जय श्रीराम नवदुर्गा उत्सव मंडळ, पदाधिकारी कार्यकर्ते पोलिस कर्मचारी उपस्थित होते.










