दानापूर(सुनीलकुमार धुरडे)- येथील स्थानिक हनुमान प्रसाद साह जनता विद्यालय येथे महात्मा गांधी यांच्या 2 ऑक्टोबर ला 150वर्ष पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये स्वच्छता जण जागृती करत गावातून प्रभातफेरी काढण्यात आली. दि 25 सप्टेंबर2019 पासून 2 ऑक्टोबर 2019 पर्यंत नियमित स्वच्छता व दुपार नंतर महात्मा गांधी यांचे स्वच्छता विषयक विचार यावर आधारित व्याख्यान, नाटिका व विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांन मध्ये स्वच्छतेचे संस्कार प्रात्यक्षिक पद्धतींने रुजावे हा महत्व पूर्ण उद्धेश पुढे ठेऊन निघाल्याने या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. आज येथील आठवडी बाजारात विद्यार्थ्यांनी साफ सफाई करत पथनाट्य सादर केले व व्यापारी व गावातील लोकांना प्लास्टिक वापरू नका असे सांगितले. या सप्ताहात संस्थेचे संस्थापक श्रीराम विखे, व्यवस्थापक, डॉ ,अजेय विखे, मुख्याध्यापक श्रीराम डाबरे, पर्यवेक्षक विलास गावंडे, व सर्व शिक्षक ,शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले आहे.