पातुर(सुनील गाडगे)- आज दि. २५.०९.१९ रोजी पोलीस अधीक्षक अकोला यांचे विशेष पथक हे पातूर तालुक्यामध्ये अवैध धंदयावर
कारवाई करण्याकरता पेटोलीग करीत असतांना त्यांना गोपनिय बातमी दारामार्फत माहिती मिळाली की, ग्राम
बेलताडा, माळराजूरा, धोदाणी या गावांच्या शेत शिवारामध्ये नदी/नाल्यांच्या काठी बाळू शिवराम चव्हाण, श्रीपद कोंडूजी शिंदे, गजानन घरमा ठाकरे हे मोठया प्रमाणात गावठी दारूची हातभटटी लावून दारू गाळीत आहेत अशी माहिती मिळाल्या वरून सापळा रचून नमूद सर्व ठिकाणी आळीपाळीने धाड टाकली असता तेथे एकूण – मोहमाव सडव्याने भरलेले पिपे – १२७ किंमत। ७६,२००/- रूपये ५० लिटर गावठी हातभटटीची दारू- किंमत ५०००/- रूपये इतर साहित्य-९००/- एकूण ८२,१००/- रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून नमूद आरोपीविरुध्द पो स्टे पातूर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.