दानापूर (सुनिलकुमार धुरडे) – येथील एकता ग्रुप च्या वतीने दानापूर प्रेस क्लबचे दिवंगत अध्यक्ष स्व: संजयकुमार वानखडे याच्यां प्रथम पुण्यसमरण कार्यक्रमा निमित्त भव्य रक्तदान शिबिर एकता ग्रुप च्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्रात आयोजित करण्यात आले होते. यावेळी सर्वप्रथम स्व:संजयकुमार वानखडे याच्यां प्रतिमेचे पूजन रामकृष्ण वानखडे, लता वानखडे, महादेवराव वानखडे, दानापूर च्या सरपंच अनुराधा गोयनका, वासुदेवराव दादळे , पी, टी, वाकोडे, तुळशीदास खिरोडकार व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. नंतर रक्तदान खोलीचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करून रक्तदान शिबिराला सुरुवात करण्यात आली.
यावेळी 55 रक्तदात्यांनी रक्तदान करून स्व :संजयकुमार वानखडे यांना श्रद्धांजली अर्पण केली. या कार्यक्रमाला पत्रकार संजय आठवले, श्यामशील भोपळे महादेवराव सातपुते, शुधोधन दरोकर, डॉ. गुलजार, डॉ. हिवराळे, डॉ. कटारे, डॉ. शाहरुख, डॉ.शिरसाठ, डॉ. वानखडे ,पातुर्डे सर, खोडे सर, प्रेमकुमार गोयनका, खिरोडकार सर, तर ते या कार्यक्रमासाठी एकता गृप चे बबलू वैलकर, नंदू नागपुरे, समीर सौदागर, भीमराव पहुरकर, विजय कोरये, मनोज वाकोडे, मधुकर वाकोडे, धमपाल वाकोडे, वाजीत शहा व एकता ग्रुप चे सदस्यांनी मेहनत घेतली. या कार्यक्रमांचे सूत्रसंचालन सचिन ठोबरे यांनी केले तर आभार नंदकिशोर नागपुरे यांनी मानले.