तेल्हारा (प्रतिनिधी)- तेल्हारा तालुका व शहर शिवसेना व युवा सेनेच्या वतीने आयोजित श्री गणेश विसर्जन मिरवणुकीत ज्या मंडळांनी उत्कृष्ट देखावे व मिरवणूक शांततेत पार पाडली आशा मंडळांना बक्षीस देण्यात आले. प्रथम क्रमांकाचे बक्षीस तानाजी मंडळाने पटकावले, दुतीय क्रमांकाचे बक्षीस धर्मवीर संभाजी मंडळाने तर तृतीय क्रमांकाचे बक्षीस श्री शिवाजी मंडळाने पटकावला.
बक्षीस वितरण सोहळा शेतकी सदन तेल्हारा येथे घेण्यात आला. कार्यकमा मध्ये ज्या मंडळानि पारंपारिक पद्धतीने मिरवणूक काढण्यात आल्या व सामाजिक संदेश चा बनवलेला देखावा साकरण्यात आला त्यांना प्राधान्य दिले. त्या मंडळांना यावेळी प्रथम येणाऱ्या मंडळाला रोख 11000 रुपये, द्वितीय येणाऱ्या मंडळाला रोख 7000 रुपये व तृतीय येणाऱ्या मंडळाला रोख 5000 रुपये, तीन पारितोषिक रोख व प्रोत्साहन पर बक्षीस म्हणून देण्यात आले.
यावेळी कार्यकम चे अध्यक्ष म्हणून शिवसेना माजी तालुका प्रमुख बंङुभाऊ रुद्रकार,प्रमुख पाहुणे म्हणून ठाणेदार विकास देवरे उपस्थितीत शिसेनेचे अनिलदादा गावंडे ,शिवसेना तालुका प्रमुख विजय मोहोङ, शहर प्रमुख विक्रांत शिंदे, अजय गावंङे, राजेश वानखङे, निलेश धनभर, विठल राव जोशी, संजय अढाऊ, मुन्ना पाथ्रीकर, रामभाऊ वाकोडे, पप्पु भाऊ सोनटक्के, सचिन थाटे, दिलीप पिवाल, रामाभाऊ फाटकर इत्यादी शिवसेना, युवासेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.