दानापूर (सुनिलकुमार धुरडे)- स्वच्छता हीच सेवा या अभियाना अंतर्गत व महात्मा गांधी याच्यां 150 व्या जयंतीचे औचित्य साधून 2 ऑक्टोबर 2014 पासून देशात स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येत आहे. त्यास 5 वर्ष पूर्ण होत आहेत म्हणून म्हणून राज्यात हा उपक्रम राबविले जात असल्याचे या वेळी सांगण्यात आले. काल दि 15 सप्टेंबर ला दानापूर ग्रामपंचायत मध्ये विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते.
या विशेष सभेचे अध्यक्ष म्हणून ग्रामपंचायत सरपंच सौ अनुराधाताई गोयनका ह्या होत्या तर प्रमुख उपस्थिती उपसरपंच कैलास पिलातरे हे होते. स्वच्छता ही सेवा अभियाना अंतर्गत प्लास्टिक मुक्तीसाठी चालू असलेल्या या कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चालू केलेल्या उपक्रमा विषयावर मार्गदर्शन करून सदर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी ग्रामपंचायत ला पाठवलेल्या पत्राचे वाचन करण्यात आले. स्वच्छता हीच सेवा ह्या अभियाना अंतर्गत शासनाचे परिपत्रक वाचन व उपक्रमावर चर्चा करण्यात आली. त्याच बरोबर गावातून स्वच्छता फेरी काढून प्लास्टिक जमा करण्यात आले व कार्यक्रमाच्या शेवटी स्वच्छतेचि शपथ गावकऱ्यांना देण्यात आली व फास्टिक मुक्त दानापूर असा ठराव घेण्यात आला.
या कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य, महिला बचत गट, गावातील नागकरिक व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते. या विशेष सभेचे कामकाज व पत्र वाचन वरिष्ठ लिपिक अशोक राहणे यांनी पाहिले. जागर फाउंडेशन ने केली जनजागृती गेल्या काही दिवसांपासून जागर फाउंडेशन ही सामाजिक संस्था स्वच्छता या विषयावर काम करत आहे. सदर विशेष सभेत आपल्या घराजवळ स्वच्छता व प्लास्टिक बंदी, उघड्यावर संडास ला न जाणे हया गोष्टीचा निरब्ध घातल्यास तर आपले आरोग्य हे चांगले राहील. सोबतच आपण प्रत्येकाने एक झाड प्रत्येकाने लावा व आपले जीवन वाचवा असा संदेश आपल्या बोलण्यातून जागर फाउंडेशन चे सुनिलकुमार धुरडे यांनी दिला.