तेल्हारा (प्रतिनिधी)– हक्काच्या पाण्यासाठी वारंवार आंदोलन करून सुद्धा प्रशासनाने कुठलीच दखल न घेता शेतकर्यांच्या तोंडाला पानेपुसन्याचे काम केले. त्यामुळे संतप्त झालेल्या हजारो शेतकर्यांनी आपल्या बैलबंड्यासह भव्य आक्रोश मोर्चा काढून शासनाचा निषेध केला व त्वरित यासंबधिचा आदेश रद्द न केल्यास याहीपेक्षा उग्र आंदोलनाचा इशारा आज दिला. यावेळी हजोरो शेतकर्यानी आमदार भारसाकळे यांना गावबंदिचा इशारा देवून १९ सप्टेम्बर पासून तहसील कार्यालय येथे शेतकर्याच्या वतीने साखळी उपोषण करण्याचे ठरविन्यात आले. गेल्या ४० वर्षापूर्वी शेकाप ने केलेल्या शेतकर्यांच्या मोर्च्याची पुनरावृत्ति आज काढलेल्या भव्य मोर्च्यातुन दिसून आली.
शेतकरी बांधवांच्या हक्काचे वाण धरणाचे पाणी अकोला शहरासाठी शासनाने आरक्षित करुण हजारो हेक्टर सिंचनाचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे वान प्रकल्प लाभ धारक शेतकरी बांधव संतप्त होउन आंदोलनाची दिशा ठरवली. गावागावातिल शेतकर्यानी एकजुट होउन ८ सप्टेंबला वाण प्रकल्प कार्यालयात हजारो शेतकर्यांची बैठकित महत्त्वपूर्ण विषयावर आमदारांची चुप्पी का? याबत सर्वानुमते ९ सप्टेंबरला जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर शासनाने वानचे पाणी पडविल्याच्या निषेधार्थ १० सप्टेंबरला आकोट विधानसभा मतदारसंघ कडकडित बंद केला. यावर शेतकर्यांना सहानुभूति न दाखवता आमदार भारसाकळे यांनी वृत्तपत्रातुन शेतकर्यांची दिशाभूल करणारी माहिती दिली. त्यामुळे संतप्त शेतकर्यानी पुन्हा पत्रकार परिषद् घेवुन आमदाराच्या दिशाभुलिचे पीतळ उघडे करून शहरासह गावोगावातिल शेतकरी स्वयंस्फुर्तिने एकवटून दि. १४ सप्टे. ला भव्यदिव्य असा बैलबंडी मोर्चा काढला.
व्हिडिओ: विसर्जन मिरवणुकीत नागीण डान्स करणे पडले महागात,३० युवकाचा मृत्यु
आठवडी बाजार येथून सुरु झालेल्या या भव्य मोर्च्यात शिस्त व् शांततेचे शेतकर्यानी दर्शन घडविलेले. शेकडो बैलबंड्यासह हजारो नागरिकांचा मोर्चा पुढे जून शहर, पोलिस स्टेशन मार्गे टावर चौक ते तहसील कार्यालय येथे धडकला. दरम्यान मोर्च्यामध्ये “पाणी आमच्या हक्काच्या नाही कुणाच्या मालकीचे” या मुख्य ना-यासह पारंपरिक ढोल्याच्या भजनातुन नारे देऊन निषेध दर्शविण्यात आला. तसेच “गणपति बाप्पा शासनाला बुद्धि दे” आशा प्रकारचे देखावे लक्ष वेधून घेणारी ठरत होती. तहसील कार्यालयात मोर्चा दाखल झाल्यानंतर उपस्थित हजारो शेतकर्यांच्या सह्यांचे निवेदन तेल्हारा तहसिलचे नायब तहसीलदार विजय सुरळकर यांना देण्यात आले. शेतकरी कामगार पक्षाने ४० वर्षापूर्वी शेतकर्याच्या विविध मागण्यासंदर्भात भव्य मोर्चा काढण्यात आला होता. यानंतर आज निघालेला भव्य मोर्चा हे त्याची पुनरावृत्ति असल्याचे ज्येष्ट शेतकर्यांनी सांगितले. यावेळी सर्वानुमते पुढील आंदोलनाची दिशा ठरवून १९ सप्टेम्बर पासून तहसील कार्यालयावर साखळी उपोषण व गावोगावत विविध प्रकारचे आंदोलन केले.