अनंत चतुर्दशी दिवशी मिरवणुकीत नागीन डान्स करताना एका युवकाला हद्यविकाराचा धक्का बसला. युवक नागीन डान्स करत असतानाच जागीच कोसळला. आजुबाजूच्या लोकांना काही समजण्याच्या आतच दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला.
एखाद्या मिरवणुकीत, लग्न समारंभात किंवा कार्यक्रमात गाण्याच्या ठेक्यावर नाचण्याची अनेकांची हौस असते. नुसते गाणे लावायचा अवकाश असतो. उत्साही मंडळींचे पाय थिरकायला सुरूवात करतात. त्यात नाचता येत नसले, तरी नागीन डान्स मात्र अनेकांना करायला येतो. मध्य प्रदेशमध्येही गणेश विसर्जन मिरवणुकीत एक ३० वर्षीय युवक गाण्याच्या ठेक्यावर डान्स करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये तो युवक बेभान होऊन नागीन डान्स करत आहे. त्यातच त्याला बाजूला उभारलेले लोकही त्याचा उत्साह वाढवत होते. यामुळे हा युवक आणखी जोरात नागीन डान्स करत होता.
गोल फेर्या मारत नागिन डान्स करता-करता त्याने अचानक उडी घेतली. यावेळी त्याला हृदयविकाराचा धक्का बसल्याने तो खाली कोसळला. जो खाली कोसळला तो पुन्हा उठलाच नाही. आजूबाजूच्या लोकानी पुढे जाऊन पाहिले असता, तो गतप्राण झाला होता. यामुळे लोकांनाही धक्का बसला.