बाळापूर (डॉ. चांद शेख)- महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघ बाळापुर तालुक्याची सभा रविवारी पारस येथील संत गजानन महाराज इंग्लिश स्कूलच्या सभागृहात महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष पुरुषोत्तम आवारे, प्रदेश सरचिटणीस अॅड सुधाकर खुमकर, जिल्हाध्यक्ष अनिल माहोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत व खेळीमेळीच्या वातावरणात उत्साहात संपन्न झाली. यावेळी देवानंद साबळे यांच्या प्रास्ताविकाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर त्र्यंबक वानखडे यांनी बाळापुर तालुकाध्यक्षपदासाठी संतोष काळे तर सचिवपदासाठी संजय वानखडे यांचे नाव सुचविले. त्याला ज्ञानेश्वर शेंडे व देवानंद साबळे यांनी अनुमोदन दिल्याने महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघ बाळापुर तालुकाध्यक्षपदी संतोष काळे तर सचिवपदी संजय वानखडे यांची एकमताने निवड करण्यात आली. त्यानंतर महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष पुरुषोत्तम आवारे, प्रदेश सरचिटणीस अॅड सुधाकर खुमकर यांनी संघटनेच्या बांधणी बद्दल विस्तृत माहिती दिली. तर जिल्हाध्यक्ष अनिल माहोरे यांनी जिल्ह्यातील संघटनेबद्दल आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांना मिळणाऱ्या घरकुला बद्दल सविस्तर चर्चा करण्यात आली.
महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघ बाळापुर तालुक्याची पुढील कार्यकारणी वाडेगाव येथे होणाऱ्या सभेत गठित करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. स्नेह भोजनानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाला संतोष दांदळे, कालिंग लांडे, देवानंद साबळे, राजू लांडे, त्र्यंबक वानखडे, विजय मेहरे, ज्ञानेश्वर शेंडे, रवींद्र भटकर, कडूराम तेलगोटे, जनार्दन साबळे, संतोष लांडे, उमेश म्हैसने, डॉ.शेख चाॅद, सुभाष अग्रवाल, आनंद पुंडे, पंकज सोनवणे, श्रीकांत आबुस्कर, तेजराव टेकाडे, शिवानंद लांडे, बळीराम लांडे, रवींद्र दांडगे, दिनकरराव भरणे, महादेव सावंत, अरुण लांडे, गणेश ताथोड, शुभम वानखेडे, श्रीकृष्ण वैराळे, बळीराम लांडे, सहदेव पुंडे, श्रीनाथ लांडे, संतोष लांडे (पारस), प्रवीण सातव, दिलीप काकड, साहेबराव भरणे, पुरुषोत्तम जुजगर आदीची उपस्थिती होती .कार्यक्रमाचे संचालन श्रीकृष्ण माळी तर राजू लांडे यांनी आभार प्रदर्शन केले.