अडगांव (दिपक रेळे): आपला संस्कृती प्रधान भारत देश त्याच्या विविधतेची सण उत्सवांची जगात दखल घेतली जाते. यापैकी एक शिक्षक दिन ….असचं एक नात गुरू शिष्याचं .काल जिल्हा परिषद कनिष्ठ महावियालय अडगाव बु. येथे स्वयंशासन तसेच शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.. शाळेत गेल्यावर जुन्या आठवणी ताज्या झाल्या..
शिस्त प्रिय असलेले तत्कालिन मुख्याध्यापक भाऊसाहेब नामदेवराव चव्हाण, आणि त्यांनी २५ते 30 वर्षापूर्वी आमच्या हातून लावून घेतलेली सागाची ,अशोकाची झाडे आजही डोलत आहेत. गावातील शाळेत त्यांनी लोकवर्गणीतून बांधलेल्या रंगमंचामध्ये आजही विविध कार्यक्रम होत आहेत.प्राथमिकचे तिडकेसर, गणेशराव वाकोडे, टिकार सर विलास निमकर्डे, खेळकर सर, चोपडे सर ,राम घाटे सर हिंगणकर मॅडम, चोरे सर, रुमालेसर, कुळकर्णी सरआणि ज्युनियर कॉलेजला शिकणारे इतिहास प्रत्यक्षात डोळ्यासमोर उभे करणारे प्रा.रमेश विरघट, राज्य शास्त्राची खडान खडा माहिती देणारे प्रा. रविंद्र जाधव, आणि अर्थशास्त्र शिकविणारे फत्तेसिंग पाटील सर, यांच्या आठवणींनी मन भरून आलं.. विशेष बाब म्हणजे यापैकी मला राज्य शास्त्र शिकवणारे प्रा. रविंद्र जाधव सर आज प्राचार्य आहेत त्यांच्याकडून शिक्षकदिनी झालेले माझे स्वागत अविस्मरणीय आहे.. याप्रसंगी मुलांना मार्गदर्शन करतांना याच विदयालयातून शिक्षण घेतलेले माझ्या वर्गातील जवळपास १५ते20 विदयार्थी आज विविध पदावर नोकरी करत आहेत.. आणि उर्वरित आपपल्या क्षेत्रात अग्रगण्य आहेत.. मग ते शेती असो, व्यवसाय असो.. हे सांगताना आम्हाला सुसंस्कारीत करणाऱ्या शाळेचा आणि तत्कालिन गुरूजनांचा मला सार्थ अभिमान वाटला…. कार्यक्रमाचे संचालन इसाक सर तर आभार प्रदर्शन सोळंके सर यांनी केले..
जि.प. प्राथ. मुले व कन्या शाळा अडगाव बु.येथेही शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.