बोर्डी (देवानंद खिरकर)- सह्याद्री अतिथीगृह मलबार हिल, मुंबई येथे संपन्न झालेल्या विशेष कार्यक्रमात राज्याचे राज्यपाल मा. श्री .सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा बोर्डी या शाळेचे मुख्याध्यापक श्री. उमेश चोरे सर यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
मातृभाषेत देण्यात येणारे शिक्षण अधिक शाश्वत व चिरंतन असते असा उल्लेख राज्यपाल महोदयांनी करून राज्य शासनाने मराठीतून शिक्षण देणारे महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ स्थापन करून एक आगळेवेगळे पाऊल उचलले आहे. आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाची संलग्नता मिळालेल्या शाळांमध्ये वेगळी अभ्यास पद्धती, मूल्यमापन पद्धती राबविली जाणार असून त्या निकषानुसार आता जि. प. प्राथमिक मराठी शाळा बोर्डी, पंचायत समिती आकोट या शाळेमध्ये विविध प्रकारचे शैक्षणिक प्रयोग करण्याची मुभा या शाळेच्या शिक्षक तथा प्रशासनास लाभली आहे. त्याच अनुषंगाने तेथील शाळा व्यवस्थापन समिती आणि सर्व शिक्षकवृंद हे या शाळेला अधिक वेगळ्या पद्धतीने शैक्षणिक संधी व सुविधा पुरवून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्यांचे भविष्य उज्ज्वल होण्याकरिता वेगळ्या पद्धतीने शिक्षणाचे धडे देत आहेत.
विपरीत परिस्थितीतही शाळेचा गाडा पुढे नेण्याची कसरत या शाळेच्या नवीन मुख्याध्यापकांना करावी लागणार आहे आणि ते नक्कीच यशस्वी होतील, या आधी कार्यरत शाळेवर ही त्यांनी नाविण्यपुर्ण पद्धतीने कार्य करून शाळेला राज्यभर प्रसिद्धी मीळवून दिलेली होती. या महत्त्व पूर्ण जबाबदारी करीता शाळा व्यवस्थापन समिती, केंद्रप्रमुख, गट शिक्षणाधिकारी मुख्याध्यापक, सर्व शिक्षकवृंद मेहनत घेत असून निश्चितीच ते अपेक्षीत ध्येय गाठतील असा आशावाद तालुक्यात व्यक्त होत आहे.