अकोला(प्रतिनिधी)- जिल्ह्यात विविध विभागात भ्रष्टाचाराची कीड लागली असून आज मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकास ४ हजाराची लाच स्वीकारताना लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ अटक केली आहे.
अकोल्यातील मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ कार्यालय वर्ग २ येथे लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकून जिल्हा व्यवस्थापक संजय बळीराम पहुरकर रा कौलखेड अकोला व रोजनदारी शेख सादिक शेख गुलाम रा गणेशपुर ता खामगाव यास लाच घेताना अटक केली.
सविस्तर वृत्त असे आहे की तक्रारदार याने त्यांची शैक्षणिक कर्जाची फाईल जिल्हा व्यवस्थापक यांच्या कडे सादर केली असता त्याला ७ हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती त्यानंतर तक्रारदार यांनी लाच लुचपत विभागाला या प्रकरणी तक्रार दिली असता आज रोजी ७ हजार लाचेची रक्कम मधील ४ हजार रुपये तक्रारदार यांच्या कडून स्वीकारताना लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी वरील दोघांना रंगेहाथ अटक केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
सदर कारवाई श्रीकांत धिवरे, पोलीस अधिक्षक, लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परीक्षेत्र अमरावती यांच्या मार्गदर्शनाखाली पंजाबराव डोंगरदिवे,अपर पोलीस अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परीक्षेत्र,अमरावती, शरद मेमाणे, पोलीस उपअधिक्षक, ला.प्र. वि.अकोला व तपासी अधिकारी- ईश्वर विजय चव्हाण,पोलीस निरीक्षक यांच्या नेतृत्वाखाली ईश्वर चव्हाण, पोलीस निरीक्षक,पो,हवा,गजानन दामोदर, नापोशि. अन्वर खान यांनी केली