पातुर (सुनील गाडगे)- पातूर येथे दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा श्रावण महिन्याच्या पवित्र दुसऱ्या सोमवारी श्री.सीदाजी महाराज व्यायाम शाळा, मंगेशदादा गाडगे मित्र परिवार तर्फे कावड यात्रा जल्लोषात काढण्यात आली. कावड यात्रेमध्ये मोरणा धरण येथून जल आणून श्री. सीदाजी महाराज मंदिर येथे जलाभिषेक करण्यात आला. या वर्षी च्या कावड यात्रेचे मुख्य आकर्षण ठरले ते, 25 फूट उंच छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती तसेच कावड यात्रेमध्ये जिल्हाभरातून आलेल्या हजारो युवकांची उपस्थिती डोळे दिपवनारी ठरली. सदर कावड यात्रेमध्ये आलेल्या शिवभक्तांमुळे पातूर शहरातील सर्व रस्ते गर्दी ने फुलून गेले होते.
कावड यात्रेमधील गर्दीमुळे काही काळ अकोला-नांदेड, बाळापुर-नांदेड हे दोन्ही राज्यमहामार्ग काही वेळे साठी बंद करावे लागले होते. पण गावातील कोणालाही त्रास न होता तसेच बकरी ईद च्या दरम्यान कावड यात्रा सर्व बजरंगी यांनी शांततेत पार पाडण्यात मोलाची भूमिका वटवली तसेच पातूर पोलीस स्टेशन चे ठाणेदार श्री. गुल्हाने साहेब यांनी चोख बंदोबस्त ठेवून परिस्थिती समर्थ पणे हाताळली.
सदर कावड यात्रा टिकेव्ही चौक येथे येऊन संभाजी चौक मध्ये श्री ऍड श्री पप्पू मोरवाल, गणेश भाऊ सांगळे, प्रकाशभाऊ तायडे, बजरंग नागे, आकाशभाऊ सिरसाट, यशपाल जाधव, अंकुश तायडे, नागेश बली, शाम बहुरूपे, राहुल भालतीलक, आकाश कवळे, श्रीकांत गांवडे या मान्यवरानी कावड यात्रेचे विधिवत पूजन केले. तेथून कावड यात्रा मार्ग क्रमण करत जुने बस स्टँड चौक गुरुवारपेठ गुजरीलाईन मार्गे श्री सीदाजी महाराज मंदिर येथे पोहचून जलाभिषेक करून समारोप करण्यात आला. सदर कावड यात्रा यशस्वी करण्यासाठी मागेशदादा गाडगे,गणेश भाऊ सांगळे ,सचिन भाऊ बारोकार,गोपाल निमंकडे, सूरज क्षीरसागर,पवन तायडे,दीपक देवकर,अजू पाटील, महिंद्रा फलके,मनीष मसने,आशिष पवार, विठ्ठल निमकाळे,आनंद पदमणे,भैरव परिहार,शुभम राऊत,निलेश गाडगे,दिगंबर फुलारी ,कैलास उगले,इतर मंगेश गाडगे मित्र परिवार च्या सर्व बजरंगी ने परिश्रम घेतले.
अधिक वाचा : हिवरखेड सेंट्रल बैंकेंची केवायसि बंद, ग्राहकांचे खाते उघडत नसल्याने ग्राहकांची तीव्र नाराजी
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola