अकोला (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन (आयटक) जिल्हा शाखेच्या वतिने दि. २२ जुलै २०१९ पासून अंगणवाडी कर्मचारी महाराष्ट्र शासनाने दिलेल्या आश्वासनानुसार मानधन वाढ व पेंशनबाबत आदेश काढत नाही. तोपर्यंत मोबाईलवर डाटा पाठविणे, मासिक अहवाल देणार नाही, विविध प्रशिक्षणावर बहिष्कार अशाप्रकारे असहकार आंदोलनाची सुरुवात करण्यात आली होती. या आंदोलनाच्या २५ दिवसानंतर महाराष्ट्र शासनाने पंतप्रधान व केंद्र शासनाने जाहिर केल्यानुसार राज्यातील २ लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधनवाढ जाहिर करुन दि. १६.९.२०१९ शासन आदेश काढला आहे.
यूनियनचे कार्याधक्ष कॉ. दिलीप उटाणे, मा. मंत्री पंकजा मुंडे, मा. रा.ल. गुजर, सहसचिव, मा. जाधव कक्ष अधिकारी, म. व बा. विभाग महाराष्ट्र यांचे सोबत त्रिपक्षीय बैठक दि. १९.९.२०१९ रोजी होवुन लवकरच इतर प्रलंबित मागण्या बाबत सविस्तर बैठकीचे आयोजन करण्यात येईल असे प्रतिपादन मंत्री महोदय यांनी केले. त्याबद्दल मुख्यमंत्री, वित्तमंत्री व मा. पंकजाताई मुंडे मंत्री महिला व बाल विकास विभाग व आमदार गोवर्धन शर्मा यांचे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन आयटक जिल्हा शाखा अकोलाच्यावतीने आभार व्यक्त करण्यात आले. हा अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या एकजुटीचा विजय आहे. तसेच अंगणवाडी युनियन आयटकचे, मेहनतीचे यश आहे. असे प्रतिपादन कॉ. एस.एन.सोनोने, कॉ. रमेश गायकवाड, कॉ. सुनीता पाटिल, कॉ. नयन गायकवाड यांनी केले आहे. ते पुढे म्हणाले या आंदोलनाला योग्य ती प्रसिध्दी वृत्तपत्र व वृत्तवाहीनी यांनी दिल्याबद्दल माध्यम प्रतिनिधीचे आभार मानले.
अंगणवाडी सेविकेला १५००/-, तर मीनी अंगणवाडी १२५०/- तर मदतनिसांना ७५०/- वाढ दि.१ आँक्टोबर २०१८ पासून दिलेली आहे. अकोला जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका १४२८, मिनी अंगणवाडी सेविका १४८, मदतनिस १५२८ यांना ही वाढ मिळणार आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी दिलेल्या सहकार्यामुळे हे यश संपादन करता आले. करीता २८ दिवसा पासुन सुरु असलेले आंदोलन तुर्त स्थगित करण्यात आले असे कॉ. एस. एन. सोनोने, कॉ. भा.ना. लांडेगुरूजी कॉ. रमेश गायकवाड, कॉ. सुनीता पाटिल, कॉ. सुरेखा ठोसर, कॉ. नयन गायकवाड, कॉ. सरोज मूर्तिजापुरकर, कॉ. दुर्गा देशमुख, कॉ. कुसुम हागे, कॉ. आशा मदने, कॉ. त्रिवेणी मानवटकर, कॉ. प्रतिभा आढे, कॉ. मंगला इंगळे कॉ. ज्योती ताथोड़, कॉ. सुनंदा पदमने, कॉ. महानंदा ढोक, कॉ. ज्योति धस, कॉ. डांगे, कॉ. कल्पना महल्ले, कॉ. अनुसया पवार, समस्थ जिल्हा व तालुका कार्यकारिनी, संपुर्ण अंगणवाडी कर्मचारी अकोला यांनी आपल्या प्रसिद्ध पत्रकाव्दारे कळविले आहे या शासन निर्णयामुळे अंगणवाडी कर्मचारी यांच्या मधे आनंदाचे वातावरण आहे, तसेच अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे जिल्हा प्रशासनाला झालेल्या त्रासाबद्दल आयटक अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने दिलगीरी व्यक्त करण्यात येत आहे.
अधिक वाचा : सुशिक्षित बेरोजगांसाठी तपेश्वरीचा नोकरी मेळावा एक स्तुत्य उपक्रम – श्री.ह.भ.प. वासुदेवराव महाराज महल्ले
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola