बोर्डी(देवानंद खिरकर) -संत नागास्वामी महाराज यात्रा निमीत्त आज सायंकाळि नागास्वामि मंदिरात शांतता समितीची सभा घेण्यात आली.सभेला अकोट उपविभागीय अधिकारी सुनिल सोनवने, ग्रामीन पोलिस स्टेशनचे ठानेदार फड साहेब, गोपनीय शाखेचे साबळे साहेब यांच्या उपस्थितीत सभा घेण्यात आली.यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सोनवणे व ठानेदार फड व गोपनीय शाखेचे साबळे साहेब यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.नंतर तुळशीरामजी ईस्तापे यांनी नागास्वामी महाराज बद्दल पुर्ण माहिती दिली.ठानेदार फड यांनी दोन शब्द सांगत यात्रे निमीत्त गावकरी मंडळींना शांतता राखण्याचे आव्हान केले.व गावातील दारू विक्रेते यांना सकाळ पासुन ते सध्याकाळ परंत पोलिस स्टेशनला बसुन ठेवण्यात येईल,कुठल्याही प्रकारे गावात दारु विक्री होनार नाही.तसेच यात्रे मधे चिडीमारी करनार्यानवर सुधा कडक कारवाई करण्यात येईल,व गावातील लोकांनी सुधा सहकार्य करावे असे सांगितले.रथाची मिरवणुक मधे वेळ वाया न घालवता जागोजागी रथ न थांबवता ठिकठिकाणी पाईन्ट फिक्स करावे म्हणजे टाईम वाचुन रथ लवकर वेळेत जाग्यावर येईल .व यात्रेला कुठलेही गालबोट लागणार नाही याचे आवाहन करण्यात आले. यात्रे मधे स्पेशल महिला पोलिस चिडीमारी करनार्यावर लक्ष ठेवतील असे सुद्धा सांगितले येवढेच नव्हे तर मी स्वताहा सकाळ पासुन रथ जागेवर येई परंत स्वताहा हजर राहनार असल्याचे सुधा सांगितले.त्या वेळी मिन्टीग मधिल सर्व मंडळीनि जोराने टाळ्या वाजवल्या व आनंद व्यक्त केला.प्रास्ताविक पत्रकार जगन्नाथजी कोंडे यांनी केले.यावेळी नागास्वामी अध्यक्ष पुर्ण संचालक मंडळ,पत्रकार ,व समस्त गावकरी मंडळी उपसस्थीत होती.