तेल्हारा(प्रतिनिधी)- अकोला जिल्ह्यातील तेल्हाऱ्यात अकोला पोलीस अधीक्षक याच्या विषेश पथकाने वरली मटक्यांचा जुगार अड्ड्यावर छाप टाकला असून या कारवाईत १ लाख ४९ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करून आठ आरोपीना अटक करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक अमोघ गावकर याच्या विशेष पथकाने तेल्हारा तालुक्यातील माळेगाव परिसरात सुरू असलेल्या वरली अड्ड्यावर छापा टाकून आठ आरोपींना अटक करण्यात आली.यामध्ये राजाराम विश्राम सावळे(६३) रा माळेगाव,शेख राजिक शेख सुभान(३१) माळेगाव,दयाराम विश्राम सावळे(५०)माळेगाव, जफ्फर खान हबीब खान(४५)माळेगाव,जगनाथ रघुनाथ अढाव(५०)काकनवाडा,प्रवीण जाणकीराम काळे(४४)माळेगाव,जेठमल दामोदर गांधी(५०)दानापूर,अनिल महादेव रावनकर(४५)काकनवाडा या आरोपींना अटक करून त्यांच्याकडून नगदी ७हजार १३० रुपये,मोबाईल अंदाजे १९ हजार रुपये असा मुद्देमाल जप्त करून घटनास्थलावर तीन मोटारसायकल किंमत १लाख २३ हजार असा ऐकून १ लाख ४९ हजारांचा १३० रुपयांचा मुद्देमाल माल जप्त केला आहे. ही कारवाई आज दुपारच्या सुमारास करण्यात आली.यामध्ये
जिल्हा पोलिस अधीक्षक अमोघ गावकर यांचे अकोला जिल्ह्यात आगमन होताच शहरातील अवैद्य धंदे करणाऱ्यांच्या मनामध्ये धडकी भरली पण हे शहरापुरती सीमित नसून ग्रामीण भागामध्ये अवैध धंदे सर्रास सुरु आहे याची प्रचिती दिवसेंदिवस विशेष पथक स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईवरून सिद्ध झाले आहे जिल्ह्यातील अवैध व्यवसाया विरुद्ध पोलिसांनी मोहीम उघडली आहे. तरी सुद्धा अवैध धंदे सुरूच आहेत. जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या मोहिमेला काही पोलिस अधिकारी सुरुंग लावण्याचा प्रयत्न करीत असून, त्यामुळे हे अवैध धंदे फोफावले आहेत. दरम्यान, शनिवारी प्राप्त गोपनीय माहितीच्या अाधारे विशेष पथकाचे पोलिस निरीक्षक मिलिंदकूमार बहाकार यांच्या पथकाने तेल्हारा तालुक्यातील माळेगाव येथील पाण्याच्या टाकी जवळ खुलेआम सुरू असलेल्या वरली अड्ड्यावर छापा टाकला. पोलिसांनी १ लाख ४९ हजार १३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून आठ आरोपीना अटक केली आहे. यावरून ग्रामीण भागातील स्थानिक पोलिसांचे अवैध धंद्यावर ते किती अंकुश आहे हे सिद्ध झाले आहे