तेल्हारा(प्रतिनिधी)- स्वातंत्र्य दिना निमित्याने तेल्हारा तालुक्यात प्रथमच एक आगळा वेगळा कार्यक्रम ‘’मन की बात युवाओके साथ ‘’. या कार्यक्रमा मध्ये अकोला जिल्हातील विविध क्षेत्रात अग्रेसर असलेल्या तरुणांना आमंत्रित करून राजकीय , सामाजिक, शेक्षणिक , शेती , उद्योग. रोजगार यांसारख्या अनेक विषयांवर उपस्थित प्रेक्षक तरुणांनी त्याच्या मनातील प्रश्न विचारून एक चर्चात्मक कार्यकमाचे आयोजन करण्यात आले होते .
सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूजन करून तेल्हारा नगरीच्या नगराध्यक्षा जयश्री फुंडकर यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. व माऊली संगीत क्लासेस च्या विद्यार्थ्यानी देश भक्ति पार गीत सादर करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी या कार्यक्रमाला सौजन्य देणारे प्रा. उज्वल दबडघाव यांचा सत्कार किशोर डामरे तर दिलीप पिवाल यांचा सत्कार अनंत सोनमाळे तर यांनी केला .
तेल्हारा तालुक्यातील सुशिक्षित तरुणांनी एकत्रित येऊन विविध क्षेत्रात अग्रेसर असलेल्या तरुणांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते त्या मध्ये डॉ अमोल रावनकार , केशवराव मेतकर ,महेश गणगणे , तुषार फुंडकर ,प्रा.राजीव खारोडे , दिलीप पिवाल ,प्रा.उज्जवल दबडघाव ,प्रा.देशमुख, रूहिना निसार अली, प्रा. योगेश कोरपे . प्रा राहुल शृंगारकर ,निलेश जवकार ,संदीप देशमुख ,विककी मल्ल . विकास पवार , शाम खाडे , विवेक खारोडे, अमोल जवंजाळ ,याची मंचावर उपस्थिती होती .
तरुणाईला योग्य दिशा मिळावी व तरुणाच्या प्रश्नांना व्यासपीठ मिळावे याकरिता तेल्हारा तालुक्यातील सुशिक्षित तरुणांनी एकत्र येऊन व्हीजन कोचिंग क्लासेस व आयुष मोबाइल याच्या सौजण्याने आयोजित कार्यक्रमा मध्ये अनेक तरुणांनी प्रश्न विचारून समाजातील अनेक प्रश्नांवर लक्ष वेधले . यावेळी जाती , धर्म बाजूला सारून स्वछ ,स्पष्ठ राजकारनाची समाजाला गरज आहे असे प्रतिपादन तुषार फुंडकर यांनी केले. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यानी बेरोजगारीच्या प्रश्न मांडताच महेश गणगणे यांनी रोजगाराभिमुख शिक्षण ही काळाची गरज आहे असे मत यावेळी मत व्यक्त केले . शैक्षणिक विषयांवर विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारून उपस्थित मंचावरील मान्यवरा समोर शिक्षण क्षेत्रातील येणार्या अडचणीनी मांडल्या . त्याच बरोबर शेती हा समाजाचा मूलभूत अंग असून आधुनिक शेतीच्या माध्यमातून जास्तीत जास्त नफा मिळवला जाऊ शकतो त्याच बरोबर तरुणांनी आज कृषि क्षेत्रात वळण्याची गरज आहे असे मत केशवराव मेतकर यांनी व्यक्त केले . मेडिकल क्षेत्रात बद्दल बोलतांना डो अमोल रावणकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व तेल्हारा तालुक्यात शिक्षणाच्या मूलभूत सुविधा पुरवल्या गेल्या पाहिजे व त्याकरिता आपण सर्वांनी सहकार्य करणे आवश्यक आहे असे प्रतिपादन प्रा.उज्वल दबडघाव यांनी केले .यशस्वी होण्याकरिता परिस्थिति आड येत नाही असे मत रूहिना अली यांनी व्यक्त केले. प्रा योगेश कोरपे यांनी स्पर्धा परीक्षा मुलखाती कुठली काळजी घ्यायाला हवी याप्रश्नवर वर मार्गदर्शन केले , चर्चात्मक कार्यक्रमातून तरुणाच्या विविध प्रश्नांनी संपूर्ण सभागृह दणाणून गेले होते . विद्यार्थ्याच्या स्पर्धा परीक्षा विषयक प्रश्नावर प्रा. राजीव खारोडे,प्रा प्रा राहुल शृंगारकर, यांनी उत्तरे दिली . यावेळी राजकीय प्रश्नावर विककी मल्ल , विकास पवार ,नीलेश जवकार ,संदीप देशमुख , विवेक खरोडे , अमोल जवंजाळ , शाम खाडे यांनी उत्तरे देऊन तरुणाची राजकरणाला गरज आहे असा मंचा वर एकच सुर निघत होत. यावेळी तेल्हारा तालुक्यातील अनेक नागरिकांनी सुद्धा सहभाग घेऊन आपल्या मनातील प्रश्नांचा पाढा वाचला .
या कार्यक्रमामध्ये तरुणांनी राजकरणात सहभागी व्हायला हंव किंवा नाही या प्रश्नावर मंच वर चांगलीच वैचारिक लढाई पेटली होती .
यावेळी कु नीता सरोदे या युवतीने “आमदार खासदार होण्याकरिता एखादी परीक्षा घेतली तर बर होईल ? हा प्रश्न उपस्थित केला . यावेळी मंचावरील उपस्थित मान्यवरांनी तरुणांनी विचारलेल्या विविध विषयांवर आपले मत व्यक्त केले व या कार्यक्रमाच्या माध्यमातून तरुणाईच्या मनातील अनेक प्रश्न यावर चर्चा करून या कार्यक्रमाची मैफिल चांगलीच रंगली होती जवळ पास चार तास चाललेल्या कार्यक्रमातून तरुणाच्या व्यक्तिमत्व विकासाला चालना मिळेल असा एकच सुर कार्यक्रमाच्या शेवटी निघत होता. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन थाटे व विशाल नांदोकार आभार प्रदर्शन अनंता सोनमाळे यांनी केले . राष्ट्रगीत म्हणून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली या कार्यक्रमा करिता जिटीपीएल न्यूज अकोला व अवर अकोला न्युज च्या माध्यमातून प्रसारण करण्यात आले होते. तरुणाच्या स्तुप्त कार्यक्रमासाठी सर्वत्र कौतुक होत आहे . या कार्यक्रमाला मोठ्यासंखेने तरुण , नागरिक , व पत्रकार बंधु उपस्थित होते . या कार्यक्रमाला तेल्हारा नगरीतील असंख्य तरुणांनी सहकार्य केले.
(विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाकरिता व तरुणांना व्यासपीठ उपलब्ध होण्या करीता मन की बात युवाओके साथ यांसारख्या कार्यक्रमाची गरज आहे. आज या कार्यक्रमाला उपस्थित राहुन अनेक प्रश्नाच्या माध्यमातून अनेक प्रश्नाची उत्तरे चर्चात्मक स्वरूपातून मला मिळाली. कु. वैष्णवी दाते )