नांदेड (प्रतिनिधी)-शहरातील मालेगाव मार्गावरील भक्ती लॉन्समध्ये दि.१७ व १८ ऑगस्ट रोजी मराठी पत्रकार परिषदेचे राष्ट्रीय अधिवेशन सुरु होत आहे. या अधिवेशनास देशभरातून अडीच हजार प्रतिनिधी उपस्थित झाले. दोन दिवसीय अधिवेशनात चर्चासत्रांची वैचारिक मेजवानी मिळणार आहे.या अधिवेशनाची जय्यत तयारी नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाने केली आहे,अशी माहिती अधिवेशनाच्या स्वागत समितीचे अध्यक्ष खा.प्रतापराव पाटील चिखलीकर व संयोजन समितीचे अध्यक्ष आ.डी.पी.सावंत यांनी दिली आहे.
मराठी पत्रकारांची मातृसंस्था असलेल्या मराठी पत्रकार परिषद मुंबईचे हे ४२ वे राष्ट्रीय अधिवेशन आहे.या अधिवेशनाचे उद्घाटन दि.१७ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता ज्येष्ठ पत्रकार पी.साईनाथ यांच्याहस्ते सानद संपन्न झाले . यावेळी मुख्य अतिथी म्हणून महसूलमंत्री चंद्रकांत पाटील,राज्यमंत्री अर्जुन खोतकर,प्रमुख मार्गदर्शक म्हणून परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख,झी-न्यूजचे कार्यकारी संपादक प्रसाद काथे तर अध्यक्षस्थानी परिषदेचे अध्यक्ष सिध्दार्थ शर्मा राहणार आहेत.तसेच, प्रमुख पाहुणे म्हणून जि.प.च्या अध्यक्षा श्रीमती शांताबाई जवळगावकर,महापौर सौ.दीक्षा धबाले,खा.हेमंत पाटील,खा.सुधाकर श्रृंगारे, आ.राम रातोळीकर, आ.अमर राजूरकर, आ.सतीश चव्हाण, आ.विक्रम काळे, आ.सुभाष साबणे, आ.प्रदीप नाईक, आ.वसंतराव चव्हाण, आ.डॉ.तुषार राठोड, आ.अमिताताई चव्हाण, आ.नागेश पाटील आष्टीकर,माजी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती सूर्यकांताताई पाटील, माजी आमदार गंगाधर पटणे,माजी मंत्री कमलकिशोर कदम, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे,पोलीस अधीक्षक संजय जाधव,जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, मनपा आयुक्त लहुराज माळी,गुरुद्वारा बोर्डाचे अध्यक्ष भूपिंदरसिंघ मिनहास आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मराठी पत्रकार परिषदेच्या सर्व माजी अध्यक्षांचा सत्कारही होणार आहे. अधिवेशन दुसरे सत्र दुपारी २ ते ३.३० वा. होणार आहे. सोशल मिडीयाचं आव्हान इलेक्ट्रॉनिक्स आणि प्रिंट मिडियाला पेलवणं आता अवघड झालयं का? यावर ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर, दै.सकाळचे संपादक श्रीमंत माने,जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे संपादक आशिष जाधव,जेष्ठ संपादक विलास आठवले,न्यूज नेशनचे संपादक सुभाष शिर्के,स्वा.रा.ति.म.वि.
नांदेडच्या वृत्तपञ विभागाचे संचालक डॉ.दीपक शिंदे, बी.बी.सी.मराठी न्यूजच्या हलिमा कुरेशी या परिसंवादात सहभागी होणार आहेत.
दुसरा परिसंवाद दुपारी ४ ते ५.३० वा.होणार आहे. यात माध्यम स्वातंत्र्य केवळ तोंडी लावण्यापुरतं उरलंय का? यावर परिसंवाद होणार आहे. यात भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये,ज्येष्ठ पत्रकार जतीन देसाई, काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत,डाव्या आघाडीचे नेते भालचंद्र कांगो,जेष्ठ कायदेतज्ञ असिम सरोदे,मुंबई मराठी पञकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे,सामाजिक कार्यकर्ते मंगल खिंवसरा हे सहभागी होणार आहेत.
दुसऱ्या दिवशी दि. १८ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० ते १०.३० वा. दरम्यान ज्येष्ठ पत्रकार व परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांच्याशी चर्चा व संवाद होणार असून ज्येष्ठ साहित्यिक देविदास फुलारी हे संवादक म्हणून काम पाहणार आहेत. परिषदेचे खुले अधिवेशन सकाळी १०.४५ ते दुपारी १२.३० वा.दरम्यान होणार आहे.समारोप समारंभ दुपारी २ ते ४ वा. दरम्यान होणार असून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे मुख्य अतिथी म्हणून तर, प्रमुख पाहुणे म्हणून कामगार मंत्री संभाजी पा.निलंगेकर उपस्थित राहणार आहेत. तर विशेष अतिथी मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख व अध्यक्षस्थानी परिषदेचे भावी अध्यक्ष गजानन नाईक हे राहणार असून यावेळी विशेष निमंत्रित म्हणून टाईम्स ऑफ इंडीयाचे वरिष्ठ संपादक प्रफुल्ल मारपकवार, आजतक चे संपादक साहिल जोशी, मुंबई मराठी पञकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे,मुंबई प्रेस क्लबचे अध्यक्ष धमेंद्र जोरे, टि.व्ही.जर्नालिस्ट असोसिएशनचे विनोद जगदाळे,मंञालय व विधीमंडळ वार्ताहर संघाचे दिलीप सपाटे,महाराष्ट्र श्रमिक पञकार संघाचे
प्रदीप मैत्र,पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे किरण नाईक,महाराष्ट्र संपादक परिषदेचे संजय मलमे,बीयुजे चे सरचिटणीस इंदरकुमार जैन उपस्थित राहणार आहेत. या दोन दिवसीय अधिवेशनाला अकोला जिल्हा पत्रकार संघाचेअध्यक्ष शौकतअली मिरसाहेब, सरचिटणीस प्रमोद लाजुरकार , प्रल्हाद ठोकणे यांच्या नेतृत्वाखाली सत्यशील सावरकर, अनंत अहेरकर, रामभाऊ फाटकर, विलास बेलाडकर सह तेल्हारा तालुका पत्रकार संघाचे पदाधिकारी उपस्थित झाले आहेत.