अकोट (सारंग कराळे)- हजारो शिवभक्ताचे श्रद्धास्थान असलेल्या निसर्गमय सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या श्री क्षेञ धारगड येथे श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी मोठ्या प्रमाणात याञा भरते. या याञेत संपुर्ण महाराष्ट्रातुन शिवभक्त दर्शनासाठी येत असतात यामध्ये मोठ्या प्रमाणात मोटरसायकल व चारचाकी वाहनाने येत असतात. परंतु वन्यजिव वन उपविभाग अकोट यांनी जाचक अटी लादल्या होत्या तसेच मोटरसायकलवर पुर्णपणे बंदी करण्यात आली होती.
त्यामुळे शिवभक्त, धारगड सेवा समिती, बजरंग दल विश्व हिंदु परीषद अकोट यांच्यात सतांपाची लाट पसरली होती. याबाबत जिल्हाचे पालकमंञी,जिल्हाधिकारी,पोलीस अधीक्षक अकोला यांना निवेदन दिले होते. परंतु वनविभागाकडुन कुठल्याच समाधानकारक उत्तर प्राप्त झाले नव्हते. अखेर आज दि १३ ऑगस्ट रोजी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष तुषार पुडकर सागर ऊकडे अवि घायसुदंर व बजरगं दल विश्व हिंदु परीषदेचे गजानन माकोडे, सुनिल देठे, सुनिल पवार विजय चदंन विजय कुलट निशीकात तळोकार सजंय बुदेले वासुदेव माकोडे धारगड समीतीचे पदाधिकारी यानी वन्यजिव वनविभाग अकोट उपवनसंरक्षक श्रीमती टी.ब्ल्युला एलील मती यांचा सोबत 5 तास चर्चा केली. या दरम्यान तुषार पुडकर यांनी शासकीय नियमाचा पाढा वाचुन दाखवला सविस्तर चर्चा झाल्यानतंर अखेर धारगड याञेकरीता धारगड टी पाॅइंट पर्यंत मोटरसायकलने जाण्यास परवानगी दिली अशा स्वंरुपाचे तोडी आश्वासन पदधीकारी यांना देण्यात आले.
तसेच धारगड याञेत मोटरसायकल बंदी वरुन शिवसेनेचे एक शिष्टमडंळ आमदार गोपीकीशन बाजोरीया यांच्या नेतुत्वात वनमंञी सुधीर मुनंगटीवार याच्यासी चर्चा केली. त्यावेळी वनममञी यांनी धारगड याञेत १८ व १९ ऑगस्ट दरम्यान कुठल्याच प्रकारच्या वाहनाला अडवणुक होणार नाही, असे आश्वासन आमदार गोपीकीशन बाजोरीया शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे राजेश मिश्रा चंदु दुबे प्रताप शिदे यांना मुबंई येथे देण्यात आले. वनविभागाच्या धारगड याञेत मोटर सायकल वरील उठवल्यामुळे शिवभक्तान मध्ये आनंदाचे वातावरण आहे.