पातूर (सुनील गाडगे)- पातूर या ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या भूमीतील आणि पातूर च्या संगित राऊत परिवारातील मनोज वसंतराव राऊत आणि मंगेश विलासराव राऊत या दोघांनी जळगांव जामोद येथे महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ यांनी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय समर गित स्पर्धेत सहभागी होऊन प्रथम क्रमांक पटकावला आहे. 10 आगस्ट रोजी या कार्यक्रमाचे जळगांव नगर परिषद च्या सांस्कृतिक सभागृहात आयोजित करण्यात आले होते. यामध्ये अकोला जिल्यातील 12 कलावंतांचा सहभाग होता.
कार्यक्रमात हार्मोनियम आणि गायन स्वतः मनोज राऊत यांनी केले तर मंगेश राऊत यांनी तबला वादन केले. यामध्ये “उज्वल अमुचा देश” या स्फूर्ती गीतांचे गायन मनोज राऊत यांनी केले, तर त्याच ताकदीचे तब्बल वादन मंगेश राऊत यांनी करून या गीताला साथ संगत दिली. या गीताच्या सादरीकरण कार्यक्रम ला कामगार कल्याण मंत्री तथा बुलढाणा पालकमंत्री संजय कुटे यांची प्रमुख उपस्थिती होती. या दोन्ही कलावंतांनी पातूर चे नाव राज्यस्तरावर चमकवले मुळे विविध स्तरावर अभिनंदन करण्यात आले आहे.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola