तेल्हारा (प्रतिनिधी)- अकोट,तेल्हारा ,शेगाव,जळगाव जा या तालुक्यातील ज्या गावांमध्ये वान धरणाच्या पाण्याचा पुरवठा होतो. त्या गावातील नागरिकांना गढूळ पाण्याचा पुरवठा होणार असून नागरिकांनी पाणी उकळून प्यावे असे आवाहन करण्यात आले आहे.
वान धरणाच्या पाण्याची पातळी वाढल्याने तसेच पाण्याचा विसर्ग सुरूच असल्याने व गाळाचे प्रमाण जास्त असल्याकारणाने ज्या गावाना वान धरणाचे पाणी मिळत आहे अशा गावातील नागरिकांनी सतर्क राहून काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांनी पिण्याचे पाणी उकळून प्यावे जेणेकरून आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार नाही. सदर पाण्याचा पुरवठा जो पर्यंत धरणातील गाळाची पातळी कमी होत नाही तो पर्यंत गढूळ पाण्याचा पुरवठा होणार आहे. जवळपास १० ते १५ दिवस गढूळ पाणी येणार असून सदर पाणी दूषित नसून गाळामुळे पाण्याचा रंग बदलला आहे. शेगाव, तेल्हारा, अकोट, जळगाव जामोद या पाणीपुरवठा करणाऱ्या नगर परिषदेच्या शुद्धीकरण प्लांटवर पाणी शुद्धीकरण सुरू असून धरणातून गाळयुक्त पाण्याचा पुरवठा होत असल्याने सदर परिस्थिती उदभवली आहे, अशी माहिती अवर अकोला न्यूजला तेल्हारा नगर पालिकेचे मुख्याधिकारी अकोटकर व पाणीपुरवठा अभियंता महेश राठोड यांनी दिली आहे.