अकोला : “फक्त काश्मीरचा नव्हे तर पाकिस्तानही भारताचाच एक भाग आहे. भारत हा इस्लामपेक्षाही जुना आहे हे मान्य करायला हवे.” अशा शब्दांमध्ये ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध मुस्लीम धर्मगुरु इमाम मोहम्मद तौवहिदी यांनी पाकिस्तानला सुनावले आहे. कलम ३७० रद्द केल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. तसेच, काश्मीर हा कधीच पाकिस्तानचा भाग होऊ शकत नाही असे सांगता टोकाची भूमिका घेणाऱ्या पाकिस्तानलाही चांगलीच चपराक दिली.
“काश्मीर कधी पाकिस्तानचा भाग नव्हताच आणि या पुढेही असणार नाही. पाकिस्तान आणि काश्मीर दोन्ही भारताचाच भाग आहे. मुस्लीमांनी हिंदू धर्म सोडून ते इस्लाममध्ये आले असले तरी संपूर्ण भूभाग हा हिंदूंचा असल्याचे सत्य बदलता येणार नाही. भारत हा पाकिस्तानच काय तर इस्लामपेक्षाहून जुना आहे. हे मान्य करायलाच हवे.” असे ट्विट करत इमाम तौवहिदी यांनी पाकिस्तानला खडे बोल सुनावले आहेत. याआधीदेखील त्यांनी पाकिस्तानची दहशतवादी कारवायांना खतपाणी घालणारी कारस्थाने पाहून सुनावले होते.
अधिक वाचा : हिवरखेडातील रँचो ने बनवले डवरणी यंत्र, शेतकऱ्यांचा वाचणार वेळ आणि पैसा
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola