अकोट (सारंग कराळे)- आकोली जहागिर व पणज येथील कावडधारी शिवभक्तांचे लोकजागर मंच परिवाराच्या वतीने दरवर्षी प्रमाणे दिवठाणा फाटा येथे स्वागत करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने पंचक्रोशीतील गावामधून शिवभक्त व गावकरी एकत्र आले होते. लोकजागर मंच च्या वतीने सर्व कावडचे पूजन श्री दीपक बोडखे यांनी केले व फराळ वितरणाची सुरुवात केली. यावेळी लोकजागर मंच जिल्हाध्यक्ष गजानन बोरोकार, तालुकाध्यक्ष अनंत सपकाळ, राजेश गावंडे, योगेश जायले, आकाश बरेठिया, अर्जुन गाळखे, सूरज शेंडोकार, देवा कायवाटे, गजानन रावनकार, रवींद्र वालसिंगे आदी उपस्थीत होते. अकोली जहागीर येथील शिवराज्य शिवभक्त मंडळ, हिंदू गर्जना शिवभक्त मंडळ, श्रीराम सेना शिवभक्त कावड मंडळ, व पणज येथील सार्वजनिक शिवभक्त कावड मंडळ यांनी कावड उत्सवात सहभाग घेत पारंपारिक पद्धतीने पूर्णेच्या पाण्याने भरलेल्या जलकलश घेऊन आपल्या आराध्य महादेवाचा गजर करीत वाजत गाजत दिवठाणा फाट्यावर आलेत. या ठिकाणी फराळाचा आस्वाद घेऊन त्यांनी आपल्या ग्रामदैवताकडे पुढील प्रस्थान केले.
फराळ वितरणासाठी आशिष उकळकर,सुरज किटके, पियुष लाहाने, सोमेश वालसिंगे, प्रविण कौलखेडे, नागेश वालसिंगे, अतुल बिहाडे, प्रशांत वालसिंगे, बजरंग वालसिंगे, गजानन कवळे, रमेश गोटेकर, ओम शेंडे, अक्षय वालसिंगे, शाम शेंडे, योगेश वालसिंगे, दिनेश शाहू,प्रसाद शेंडे, संतोष वालसिंगे, गणेश गोल्हर, संजय आवंडकार, मनोज दुधे, श्रीकांत बंगाळे, नंदकिशोर जायले, गजानन जायले, विक्रम रनगिरे, नागेश जायले, रोशन दामदार, अविभाऊ बघेले, राम बघेले, अजय वडतकार, मुकींदाभाऊ दामदर, मनीषभाऊ बंगाळे, दिलप भाऊ भगत, ज्ञानेश्वर गाळखे आदी सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी उपस्थीत ग्रामस्थ व शिवभक्तांनी लोकजागर च्या उपक्रमाचे कौतूक करत समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमस्थळी अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे एएससाय श्रीकृष्ण गावंडे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola