तेल्हारा (प्रतिनिधी)- तेल्हारा तालुक्यातील भोकर येथील युवक काही दिवसांपूर्वी वाहून गेला होता. अद्याप त्याचा थांगपत्ता लागला नाही. आज पुन्हा पंचगव्हान येथील प्रशांत बाळकृष्ण गवारगुरु (३६) हा विद्रुपा नदीच्या पात्रात बुडाला. तर दापुरा येथील २२ वर्षीय धर्मा रामकृष्ण वानखडे हा दापुरा येथील पोहरा नाल्याला आलेल्या पुरात वाहून गेल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली. सदर दोन्ही युवकांच्या गावातील नागरिक व संत गाडगेबाबा आपत्कालीन बचाव पथक पिंजर दोन्ही युवकांचा शोध घेत आहेत. यावेळी तेल्हारा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विकास देवरे व महसुलचे कर्मचारी उपस्थित आहेत.
अधिक वाचा: भारत राखीव बटालियन कॅम्प तेल्हारा तालुक्यातच राहावा – अनिल गावंडे
Comments 1