तेल्हारा (प्रतिनिधी)- तेल्हारा तालुक्यातील तळेगाव वडनेर येथे या पूर्वी मंजूर करण्यात आलेला भारत राखीव बटालियन कॅम्प शिसा उदेगाव व हिंगणा शिवारात हलविण्यात आल्याने येथील सुशिक्षित बेरोजगार युवकांचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सदर कॅम्प तेल्हारा तालुक्यातच राहावा असे, लोकजगार मंचचे अध्यक्ष अनिल गावंडे यांनी सांगितले.
तेल्हारा तालुक्यातील तळेगाव वडनेर येथे होणारा( आय.आर .बी.) भारत राखीव राखीव बटालियन कॅम्प क्र.५ आता राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी देण्यात आलेल्या मान्यतेनुसार अकोला तालुक्यातील शिसा उदेगाव व हिंगणा येथे निर्मिती होणार आहे. त्यामुळे हा तालुक्यावर अन्याय आहे. हा प्रकल्प इतरत्र इतरत्र वळविल्या गेल्यामुळे सुशिक्षित बेरोजगार युवकाना मिळणाऱ्या रोजगारावर गदा आली आहे.
आधीच या तालुक्यात कोणत्याही प्रकारची रोजगाराची संधी येथील युवकांना नाही. त्यामध्ये आता तळेगाव वडनेर येथे सदर कॅम्प बद्दल संबंधी त अधिकाऱ्यांनी सकारात्मक अहवाल दिल्यामुळे च कॅम्प ला मंजुरी मिळाली असतांना ऐनवेळी हा प्रकल्प इतरत्र पडविण्यात आला. हा तेल्हारा तालुक्यावरच न्हवे तर संपूर्ण आकोट मतदारसंघावर हा अन्याय झाला आहे. यावर आमदार व पालकमंत्री यांनी पुनर्विचार करावा अशी मागनी लोकजगार मंचचे अध्यक्ष अनिल गावंडे यांनी केली.