अडगाव बु” (दिपक रेळे)- गेल्या 24 तासांपासुन सुरु असलेल्या संततधार पावसाने शेतीचे व घरांचे मोठ्या प्रमाणात
नुकसान झाले असून, काही काळ गावांचा संपर्क तुटला होता. सतत सुरु असलेल्या पावसामुळे बय्राच घरांची पडझड झाली आहे. पुराच्या पाण्यामुळे अडगाव बु. ते अकोट,अडगाव बु., तळेगाव बु. या गावाचा संपर्क दिवसभर बंद होता. गावातून वाहणाय्रा विदुपा नदीमुळे गावातील देवीपुर भागाचा संपर्क काही काळ तुटला होता.
जि.प. बांधकाम विभागाने चुकीच्या पध्दतीने बांधलेल्या लगतच्या अडगा व बु. ते मालठाणा बु. रस्त्यावरील मोठा नाल्यावरील पुलामुळे यावर्षी चौथ्यांदा शेतकय्रांच्या शेतीत पाणी शिरले. सातपुड्याच्या कुशीतून वाहत येणार भरपूर पाणी वेगाने मोठा नाल्याला येते. त्यामुळे अडगाव बु” मालठाणा रस्त्यावरील हा पूल लांब व उंच बांधा अशी विनंती नाल्यालगतचे शेतकरी वारंवार करीत होते. परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. पुलाला लागून बांधलेली निकृष्टदर्जाची संरक्षण भिंत पहिल्या वर्षीच्या पुरात वाहून गेली होती. याबाबत शेतकऱ्यांनी वारंवार तक्रारी केल्या, परंतु शासनाच्या दुर्लक्षितपणामुळे आतापर्यत चार वेळा पुराचे पाणी शेतात घुसुन शेतीचे नुकसान झाले आहे.
गुरुवारी सकाळी पुराच्या पाण्याचा जोर वाढल्याने 100 ते 150 एकर शेतीतील उभ्या पिकात पाणी घुसल्याने जमीन खरडुन गेली. बिटु बहाकर या शेतकय्राचे लिंबूची 100 झाडे,दोन स्प्रिकलर संचाचे पाइप व ट्यबवेलचा बॉक्स पुराच्या पाण्यात वाहुन गेले. त्यामुळे त्यांचे मौठ्या प्रमाणात नुकसान झाले. परिसरातील नकसानग्रस्त भागाचे सवैक्षण करुन मदत देण्याचा मागणा होत आहे.
अधिक वाचा: ब्रेकिंग – वाण धरणाचे दरवाजे उघडले,नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा ईशारा