अकोला(प्रतिनिधी)- बंजारा समाजातील गुणवंत विध्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे, त्यांनी भविष्यात आणखी मोठे यश मिळवावे. या करिता गोरसेनेच्या वतीने अकोल्यातील शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयात तब्बल 35 बंजारा समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव आणि त्यांच्या पाल्यांचा सत्कार करण्यात आला.
कधीकाळी डोंगर दऱ्यात राहणार बंजारा समाज, आज प्रगत समाजाच्या प्रवाहात आला आहे. बंजारा समाजात आज अनेक शासकीय अधिकारी कर्मचारी घडले आहेत. या सर्व अधिकाऱ्यांनी आपल्या परिस्तिथीवर मात करत, प्रगतीच शिखर गाठलं आहे. यांच्या प्रमाणेच आजचा विध्यार्थी भावी आयुष्यात प्रगत व्हावा , शिक्षित व्हावा यासाठी बंजारा समाजातील गुणवंत विध्यार्थ्यांचा सत्कार गोरसेनेच्या वतीने करण्यात आला.
अकोल्यातील शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयात आयोजित या सोहळ्यात तब्बल 35 गुणवंत विध्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये दहावीमध्ये 75 टक्के आणि त्यापेक्षा अधिक गुण मिळवणारे विध्यार्थी , बारावीमध्ये 70 टक्के आणि त्यापेक्षा अधिक गुण मिळवणारे विध्यार्थी आणि एम एच टी-सी ई टी मध्ये 50 टक्के आणि त्यापेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विध्यार्थ्यांचा गुण गौरव करण्यात आला, तर त्यांच्या पाल्यांचा सत्कार करण्यात आला. या सोहळ्याला गोर सिकवाडीचे संयोजक प्रा. रवी राठोड, राठोड एकॅडमीचे प्रा. स्वप्नील राठोड प्रमुख अतिथी म्हणून प्रल्हाद जाधव, रामेश्वर राठोड, प्रकाश राठोड, लक्ष्मण राठोड, सुजित राठोड, दिलीप पवार, किशोर राठोड, प्रा. संतोष चव्हाण , डॉ अमित जाधव, डॉ. सुनील चव्हाण, डॉ. विजय चव्हाण, गोरसेना अकोला जिल्हाध्यक्ष मनोहर राठोड, अकोला महानगर अध्यक्ष रतन आडे आणि बंजारा समाजातील विध्यार्थी आणि त्यांचे पालक उपस्थित होते.
अधिक वाचा : ब्रेकींग : लाइव्ह अपडेट्स : काश्मिरातील कलम ३७० रद्द करण्याची केंद्राची शिफारस
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola