तेल्हारा (प्रतिनिधी) : शेतकरी संघटना व विदर्भ राज्य समिती कडून महाराष्ट्रात तालुक्यातील वीज वितरक केंद्रावर आंदोलन करण्यात आले. वीज वितरक कंपनी चे उप कार्यकारी अभियंता एस. टी. कोव्हाळ यांना शेतकरी संघटने तर्फे निवेदन देण्यात आले. हे निवेदन मुख्य अभियंता मार्फत राज्याचे मुख्यमंत्री याच्या पर्यंत पोहचवणे हा उद्देश होता. या निवेदनात वीज दर आकार कमी करण्यात यावा. विजेचे उत्पादन विदर्भात होत असून विदर्भ वासीयांना वीज दर जास्त भरणा करावा लागतो. इतर राज्यात वीज दर कमी आहेत.
विदर्भाची नैसर्गिक संपात्ती कमी होत आहे. मीटर भाडे, इतर कर हे ग्राहकांना न सोसणारे असून वीज वितरक कंपनी ही ग्राहकांची लूट करीत आहे. कंपनी चा कारभार हा मोनोपल्ली होत चालला आहे. विदर्भातील वीज दर निम्मे करावे. शेती पंपाची वीज बिल पूर्णपणे सूट करण्यात यावी. ग्रामीण भागातील लोड शेडिंग बंद करावी. ग्राहकांना सर्व्हिस पुरवण्यात यावी. सर्व वीज ग्राहकांनी वीज बिलांची होळी केली.
यावेळी शेतकरी संघटना तालुका प्रमुख लक्ष्मीकांत कौठकर, युवा आघाडी निलेश नेमाडे, अकोट तालुका प्रमुख प्रफुल्ल बदरखे, मंगेश रेळे, दिनेश गिर्हे, अमोल मसुरकर, जाफर खा, दादा भाऊ टोहरे, दिलीप वानखडे, प्रवीण शर्मा, संतोष तायडे, अजय तायडे, संजय ढोकणे, महेश उमाळे, संतोष चतारे, सागर गोलार, दीपक डाबेराव, सागर तायडे व इतर शेतकरी उपस्थित होते.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola