तेल्हारा (प्रतिनिधी) : सहकार क्षेत्रात अतिशय महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या तेल्हारा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आज घेण्यात आलेल्या सभापती व उपसभापती पदाच्या निवडणुकीत सभापती पदी पुरुषोत्तम पाथ्रीकर तर उपसभापती पदी अरविंद अवताडे यांची अविरोध निवड करण्यात आली निवड होताच शेतकरी सहकार पँनल सह त्यांच्या सहकाऱ्यांनी ढोल ताशाच्या गजरात फटाक्यांची आतिषबाजी करून नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले.
आज 2 ऑगस्ट ला तेल्हारा बाजार समितीच्या सभागृहात सुरेश दादा तराळे यांनी व उपसभापती भरत बरींगे यांनी ठरल्याप्रमाणे आप आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या सभापती व उपसभापती पदासाठी निवडणूक घेण्यात आली या वेळी सभापती पदासाठी पुरुषोत्तम पाथ्रीकर व उपसभापती पदासाठी अरविंद अवताडे यांचा प्रत्येकी एकच अर्ज आल्यामुळे निवडणूक अधिकारी उपविभागीय अधिकारी रामदास सिद्धभट्टी यांनी त्यांची अविरोध निवड झाल्याचे जाहीर केले या वेळी निवडणूक प्रक्रियेकरिता त्यांना विष्णू मोरे, आर के तायडे, बाजार समितीचे सचिव सुरेश सोनोने यांनी सहकार्य केले.
अधिक वाचा : भोकर येथील नदीत बुडालेल्या युवकाचा शोध घेण्यासाठी संत गाडगेबाबा पथक वांगेश्वरात दाखल
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola