तेल्हारा (प्रतिनिधी) : तेल्हारा तालुक्यातील भोकर येथील 22 वर्षीय युवक हा गेल्या चार दिवसांपूर्वी भोकर येथील विद्रुपा नदीमध्ये बुडाला होता. मात्र अद्याप त्याचा शोध न लागल्याने आज सकाळी पिंजर येथील संत गाडगेबाबा आपत्कालीन पथक वांगेश्वर येथे दाखल झाले असून शोध कार्य सुरू केले आहे.
भोकर येथील २२ वर्षीय नितीन सुनील दामोदर हा भोकर गावाला लागून असलेल्या विद्रुपा नदी मध्ये दि २९ जुलै रोजी सकाळी १० वाजेच्या दरम्यान बुडाला होता. दुसऱ्या दिवशी ३० जुलै रोजी मुंडगाव येथील आपत्कालीन पथकाने नितीनचा शोध घेतला मात्र तो सापडला नाही.
आज सकाळी पिंजर येथील संत गाडगेबाबा आपत्कालीन पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे हे आपल्या पथकाला घेऊन वांगेश्वर येथे दाखल झाले असून शोध कार्य सुरू केले आहे. नितीनचा शोध लागेपर्यंत शोध कार्य सुरू राहणार असल्याचे पथक प्रमुख दीपक सदाफळे यांनी अवर अकोला न्युज शी बोलतांना सांगितले.
अधिक वाचा : अकोला – जिल्हा परिषदेचा पारदर्शक कारभार, विविध योजनांच्या लाभार्थ्यांची निवड लकी ड्रॉ द्वारे
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola