अकोला : चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला आज जिल्हा सत्र न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा तर ६५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच शासनातर्फे पीडितेला ५ लाख रुपयांची मदत करण्याचे आदेशही दिले. ही घटना मूर्तिजापूर पोलीस ठाण्याअंतर्गत ८ फेब्रुवारी २०१३ रोजी घडली होती. प्रशांत उर्फ गुड्डू शंकर इंगळे, असे आरोपीचे नाव आहे.
घटनाक्रम – पीडित कुटुंबात आई आणि तिच्या दोन मुलांसोबत राहत होती. ८ फेब्रुवारी २०१३ ला प्रशांत उर्फ गुड्डू शंकर इंगळे हा त्यांच्या घरी मद्यधुंद अवस्थेत आला. त्याची अवस्था पाहत तक्रारदारांनी त्याला घराच्या बाहेर जाण्यास सांगितले. त्यांनी शेजार्यांकडे धाव घेतली. दरम्यान, आरोपीने दीड वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार केला. हा प्रकार पाहताच चिडलेल्या महिलेने आरडाओरड केली. त्यावेळी आरोपीने धमकी दिली व तेथून पळून गेला. पीडित कुटुंबातील महिलेने मूर्तिजापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी आरोपी प्रशांत इंगळे विरोधात कलम ४४८, ४५२, ३५४, ३७६ कलमान्वये तसेच पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करुन त्यास अटक केली.आधी जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. आय. आयर्लंड यांच्या न्यायालयात सरकार पक्षातर्फे ६ साक्षीदार तपासण्यात आले. विविध कलमान्वये आरोपीला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली. इतरही कलमाद्वारे कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच त्याला ६५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. यासोबतच न्यायालयाने पीडित कुटुंबाला ५ लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश शासनाला दिले आहे. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील अॅड. मंगला पांडे यांनी बाजू मांडली.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola