पातूर (सुनील गाडगे) : विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासोबत लोकशाहीचे धडे गिरवण्याचा अभिनव उपक्रम पातूरच्या किड्स पॅराडाइज पब्लिक स्कूल मध्ये राबविण्यात आला.
नुकतीच शालेय मंत्रिमंडळासाठी निवडणूक पार पडली. या निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदी ख़ुशी राठोड हिची तर उपमुख्यमंत्री म्हणून गायत्री पेंढारकर या विद्यार्थिनींची वर्णी लागली आहे. या झालेल्या निवडणुकीत उमेदवार होते, बॅलेट पेपर होते आणि निवडणूक जिंकल्यानंतरचा जल्लोषही होता.
या शालेय मंत्रिमंडळाच्या निवडणुकीत एकूण त्र्याएंशी उमेदवार रिंगणात उभे होते. त्यापैकी सोळा उमेदवार विजयी झाले आहेत. तरनऊ मते अवैध झाली व सात जणांनी नोटा या मतांचा वापर केला. त्यामध्ये श्रावणी खरडे, यश महल्ले, गार्गी ढोकणे, तन्मय महोकार, आनंद राठोड, गौरी इंगळे, सायली खेडकर, श्रेयश बगाडे, योजना उगले, हर्षल वानखडे, सिद्धी पाकदुने, अनिकेत घोरे, ख़ुशी राठोड, अनिकेत ढाळे, गौरव बंड, गायत्री पेंढारकर आदी विदयार्थ्यांनी बाजी मारली. यावेळी विजयी झालेल्या विद्यार्थ्यांचा शाळेचे संस्थापक गोपाल गाडगे व कार्यकारी संचालिका सौ. ज्योत्स्ना गाडगे यांनी सत्कार केला.
निवडणूक प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक चंद्रमणी धाडसे, प्रगती टाले, सुषमा इनामदार, भाग्यश्री तुपवाडे, नितु गिऱ्हे, सविता गिराम, कुसुम निखाडे, सुलभा परमाळे, नरेंद्र बोरकर, सुलभा तायडे, शीतल जुमळे, तुषार नारे, निकिता ढोकणे, गायत्री बराटे, प्रणाली उपर्वट, सै. वकार, शुभम पोहरे, रुपाली पोहरे, अनुराधा उगले, मेघा वडतकर आदींनी परिश्रम घेतले.
अधिक वाचा : भरदिवसा अपार्टमेंटमध्ये चोरीचा प्रयत्न ; अकोल्यात २ फ्लॅटचे तोडले कुलूप
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola