हिवरखेड (धीरज बजाज) : काल सकाळी अकोला जिल्ह्यातील हिवरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या तेल्हारा तालुक्यातील भोकर येथून विद्रूपा नदीच्या पुरात वाहून गेलेला युवक नितीन सुनील दामोदर याचा अजूनही पता लागलेला नसून अकोला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नैसर्गिक आपत्ती विभागाचे सुनील कल्ले यांच्या नेतृत्वात हरिहर निमकंडे, प्रेम दामोदर, तसेच शौर्य आपत्कालीन पथक अकोलाचे अंकुश डोंगरे अक्षय श्रीवास्तव आणि संतनगरी आपत्कालीन पथक मुंडगाव चे शाम वानखडे आणि त्यांचे कार्यकर्ते इत्यादी लोकांची चमू वाहून गेलेल्या युवकाचा निरंतर शोध घेत आहे.
नदीचा पुर कमी झाल्यामुळे पाण्यात बोट चालविणे शक्य नाही.
त्यामुळे नदीच्या दलदलयुक्त पाण्यात आणि जलचर प्राण्यांच्या नुकसान पोहोचवण्याच्या शक्यतेनंतरही नैसर्गिक आपत्ती विभागाचे सुनील कल्ले यांच्या नेतृत्वात सदर चमू आपल्या जीवाची पर्वा न करता अनेक किलोमीटर नदीमध्ये पायी चालत काल वाहून गेलेल्या युवकाचा शोध घेत आहेत. बचाव पथकाच्या सर्व समावेशक व्यक्तींच्या कार्याची करावी तेवढी स्तुती कमीच आहे.
अधिक वाचा : उद्या प्रहार चे विविध मागन्यांसाठी राज्यव्यापी ‘जेलभरो आंदोलन’…
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola