अकोला (प्रतिनिधी) : प्रहार जनशक्ती पक्ष प्रमुख आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वात, प्रहार जनशक्ती पक्षाचे राज्यव्यापी ‘जेलभरो आंदोलन’ दि. ३१ जुलै २०१९ रोजी होणार आहे. अकोला जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी बांधव यांनी ३१ जुलै रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा अधिकारी कार्यालय अकोला येथे निवेदन देऊन जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे.
जेलभरो आंदोलनातील प्रमूख मागण्या…
१) शेतकऱ्यांना संपुर्ण कर्जमाफी द्यावी.
२) पिकविम्याचा ची रक्कम तातडीने द्यावी.
३) शेतीच्या पेरणी ते कापणी पर्यंत कामांचा समावेश मनरेगा अंतर्गत करावा.
४) घोषीत झालेल्या दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान द्यावे.
५) दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क माफ करावे.
६) ओबीसी साठी स्वतंत्र घरकुल योजना करुन आर्थिक तरतूद करावी.
७)ओबीसी च्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वस्तीगृह निर्माण करावे.
८)आदिवासींचे प्रलंबित वनहक्क जमीन पट्टे त्वरीत वाटप करावेत.
९) स्व.गोपीनाथ मुंढे शेतकरी अपघात विमा योजनेत शेतमजूर व कामगारांचा समावेश करावा.
१०)कांदा, तूर, ऊस उत्पादकांना जाहीर केलेले अनुदान तातडीने देण्यात यावे
११) वाळलेल्या फळबागांना नुकसान भरपाई देण्यात यावी.
१२) दुबार पेरणीच्या संकटात असलेल्या शेतकऱ्यांना तातडीने बियाणे, खते व आर्थिक मदत द्यावी.
१३) प्रकल्प ग्रस्तांना पुनर्वसन, मोबदला व नोकरी द्यावी.
१४) निराधार विधवा माता भगिनींना वार्षिक १०००० रुपये भाऊबीज भेट द्यावी.
१५)अकोला आकोट रस्त्याचे काम जलद गतीने करण्यात यावा तसेच कावळधारी शिवभक्तांसाठी स्वतंत्र पायदळ रस्ता तयार करावा जेणे करून त्यांना रस्त्यावरून चालता तरी येईल
१६)अकोला आकोट रस्त्याची काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत आहे आहे तरी संबंधित अधिकारी व ठेकेदारावर तात्काळ कारवाई करावी
१७) संपूर्ण जिल्ह्यातील रस्ते खडामय झोले आहे विशेषतः आकोट तेल्हारा विभागातील रस्ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत आहेत आकोट हिवरखेड मार्ग तयार होवून एक महिना सुद्धा झाला नाही रस्त्यावर खडे पडले आहेत तरी जिल्हा अधिकारी साहेब याचा अध्यक्षते खाली चोकशी समिती नेमून कारवाई करण्यात यावी तरी या आंदोलनात शेतकरी, शेतमजूर, कामगार, विद्यार्थी आदींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आव्हान प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख तुषार पुंडकर यांनी केले आहे.
अधिक वाचा : बाळापूर पोलिसांनी दिले 10 गोवंशना जीवनदान, 4 लाखाचा मुद्देमाल जप्त
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola