दानापूर (सुनिलकुमार धुरडे) :
पालखी सह, बाल संप्रदाय भजन मंडळ व विद्यार्थी यांनी केली वेशभूषा
वृक्ष दीडी त ४००विद्यार्थी सहभागी, बाल संप्रदाय मंडळ ठरलं आकर्षण…
वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वन चरे जगात गुरू तुकोबा रायनी सांगून ठेवले. यांचा अनुभव आज आला. वृक्ष जगवणे ही काळाची गरज असून महाराष्ट्र शासनाने चालवलेल्या 33 कोटी वृक्ष लागवडीचे ध्येय साध्य करण्यासाठी खारीचा वाटा म्हणून दानापूर येथील जिल्हा परिषद शाळा मुले व जिल्हा परिषद शाळा कन्या याच्यां पुढाकाराने गावातून वृक्ष दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.
या मध्ये सकाळी विद्यार्थ्यांना फेटे बांधून, वेशभूषा करवून हातात भगव्या पताका घेत बाल संप्रदाय मंडळी याच्या जय घोषणा नी अवघे गाव नाहून निघाले. यामध्ये सर्व प्रथम पालखीला सजवून त्या मध्ये विविध प्रकारचे वृक्ष ठेवण्यात आली व गावातील मुख मार्गाने वृक्ष दिंडीला सुरवात करण्यात आली.
या मध्ये सर्व प्रथम सरपंच सौ. अनुराधा गोयनका, जिल्हा परिषद सदस्य श्रीकांत खोने, शाळा शिक्षण समिती अध्यक्ष महादेवराव वानखडे, संजय हागे यांच्या हस्ते वृक्ष दिंडीचे पालखीचे पूजन करुन दिंडीला सुरुवात करण्यात आली.
या वेळ मा सरपंच भोजराज पालीवाल, मा सरपंच सौ. दिपमाला दामधर, साहेबराव वाकोडे, श्रीकृष्ण दांदळे, पी. टी. वाकोडे, रवींद्र ढाकरे, संदीप पालीवाल, निर्मला राऊत, सुरेश दामधर, आनंद नाठे, प्रल्हाद हागे, पुजाजी हागे, विजय वाकोडे, सखाराम नटकूट, गणेश घायल, नंदू नागपुरे, गोपाल विखे, पत्रकार प्रेमकुमार गोयनका कैलास महाराज बोडखे, मुख्यध्यापक श्री पातुर्डे, मुख्यध्यापक श्री, सुताडे, शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी दोन्ही शाळेच्या आवारात सरपंच, जिल्हा परिषद सदस्य व गावातील प्रतिष्ठित मान्यवरांच्या हस्ते वृक्ष रोपण करण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक मुख्याधयापक श्री, पातुर्डे यानी, सूत्र संचालन श्री, ठोबरे तर आभार मुख्याध्यापक ठोबरे यांनी केले.
अधिक वाचा : मतदार नोंदणी तसेच भाजपा सदस्य नोंदणी मोठ्या प्रमाणात करण्यासाठी बैठक संपन्न
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola