सांगली (प्रतिनिधी)- जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कंत्राटी वीज कामगारांनी विविध मागण्यांसाठी गुरुवारी आंदोलन केले. आंदोलकांनी सरकारच्या विरोधात निदर्शने केले. तसेच वीज वितरण विभागात नव्याने होणाऱ्या भरती प्रक्रियेत कंत्राटी कर्मचाऱ्यांचा प्रामुख्याने विचार करावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कंत्राटी वीज कामगार युनियनकडून करण्यात आली. कामगारांच्या मागण्यांच्या बाबतीत सरकारने तातडीने दखल न घेतल्यास ऊर्जामंत्र्यांच्या दालनात अर्धनग्न आंदोलन करण्याचा इशाराही आंदोलकांनी दिला आहे.
कंत्राटी कामगारांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. कामगारांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणी कंत्राटी कामगारांनी प्रामुख्याने केली आहे. ऊर्जा विभागात भरती प्रक्रिया होणार आहे. या भरतीमध्ये प्रामुख्याने गेल्या अनेक वर्षांपासून कंत्राटी वीज कामगार म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात यावा. तसेच, भरती करत असताना आयटीआयच्या गुणांच्या टक्केवारीचा निकष लावण्यात यावा. इतर पदांप्रमाणे ऑनलाइन परीक्षा घेऊन बौद्धिक व शारीरिक क्षमतेवरून निवड प्रक्रिया पूर्ण करावी. कंत्राटी कामगारांसाठी भरतीमध्ये वयाची अट शिथिल करावी यासह विविध मागण्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी केल्या आहेत.
अधिक वाचा : शेतात गुप्तधन शोधणारी 8 जणांची टोळी पकडली,अकोट ग्रामीन पोलिसांची धडक कारवाई
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola