अकोट (देवानंद खिरकर ): अकोट तालुक्यातील दहिखेल शेतशीवारात एका शेतात गुप्तधन शोधत असलेल्या टोळीला एका शेतात अकोट ग्रामीन पोलिसांनी रंगेहात पकडले.शेतमालकासह या टोळीतील 8 जणांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत.
दहिखेल शेतशीवारातील रितेश पवार यांच्या शेतात शेत मालक रितेश पवार वय 41 रा.अकोलखेड गुप्तधन शोधणार्या टोळीतील योगेंद्र जानराव बोके वय 32 रा.वरखेड़ ता.तिवसा सागर अरुण खाकसे वय 28 रा.तिवसा जी.अमरावती निलेश नथुजी गोळाईत वय 34 रा.अचलपुर मंगेश गजानन बनारसे वय 30 रा. ऊबेगाव मिथुन रामेश्व्र खवले वय 26 रा.भंडारज मुकेश जीवनलाल तुरकर वय 29 रा.ऊबेगाव रोड मध्धप्रदेश लोकेश डेलीराम खुडसाम वय 30 रा.लोनसा ता.वारशिवनि हे गुप्तधन काढन्यासाठी गेले होते.
टीकास,फावडे, लोखंडी सब्बल,टोपडे,लाल रंगाचा कपडा नारळ,अगरबत्ती पुडा,शेदर,मोहरीच तेल,तीळ,ऊडीद,कापुर,मचिस,लिंबू,काजळाची डब्बी,यच वापर करित असतांना पोलिसांनी त्यांना रंगेहात पकडले.त्यांच्या कडून उपरोक्त साहित्यासह 7 मोबाइल,अल्टो कार गाडी,असा एकुण 1,77,850 रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.व 8 जना विरुध कलम 3 (1),(2) महाराष्ट्र नरबळी,ईतर अमानुष,अनिस्ठ,व अघोरी प्रथा जादूटोना प्रतिबधक अधिनियंमम कायदा 2013 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
सदर कारवाई यस डी पी ओ सुनिल सोनवने यांच्या मार्गदर्शनाखाली अकोट ग्रामीणचे ठानेदार न्यानोबा फड,नारायण वाडेकर,प्रवीण गवळी,अनिल सिरसाट,रामेश्वर भगत,विजय साबळे,वामन मिसाळ, चालक मोतीराम गोंडचवर,सुनिल फोकमारे गजानन भगत यांनी केली.
अधिक वाचा : अकोला मनपा आयुक्तांची कारवाई ; प्लास्टीकची ४७ पोते जप्त
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola