तेल्हारा (प्रतिनिधी) : तेल्हारा येथील बसस्थानाकावरील पिण्याच्या पाण्याची टाकी मधून गेल्या अनेक दिवसांपासून दूषित पिण्याचे पाणी येत असल्याबाबत समस्या काही प्रवासी व विद्यार्थ्यांनी युवासेना पदाधिकारी यांच्या समोर मांडली असता युवासेना पदाधिकारी यांनी विद्यार्थी व प्रवासी यांच्या सह तेल्हारा येथील बस स्थानक गाठून बस आगार प्रमुखांना व संबंधित कर्मचारी यांना वेठीस धरले.
तेल्हारा येथील बसस्थानका मधील पिण्याचे पाण्याची टाकी ही अत्यंत घाण व अस्वच्छ असल्यामुळे या टाकीच्या नळामधून घाण व शेवाळ येत आहे या मुळे प्रवासी व विद्यार्थी याचे आरोग्य धोक्यात येत आहे याबाबत आज युवासेनेचे पदाधिकारी यांनी निवेदन दिले व या निवेदनाची दखल घेत पिण्याचा पाण्याचा ऑन दि स्पॉट पंचनामा झाला या पंचनामा मध्ये तेल्हारा येथील तहसीलदार सुरळकर साहेब, पाणीपुरवठा अधिकारी राठोड साहेब न.प. तेल्हारा. पोलीस कर्मचारी, यांनी पंचनामा करून सदर पाण्याचे सॅम्पल पाठविण्यात आले आहेत. यावेळेस काही काळ बसस्थानक परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
अधिक वाचा : वाणची पाणीपुरवठा पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया, दुरुस्ती होईपर्यंत ८४ खेडी पाणीपुरवठा बंद
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola