अकोट (देवानंद खिरकर) : दक्षिण आफ्रिकेतील किलीमंजारो हे हिमशिखर सर करणारा अकोटचा दिव्यांग धीरजने बंडू कळसाईत यांच्या विक्रमाची नोंद महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस् घेण्यात आली आहे. या झेपमुळे अकोटच्या नावलौकीक मध्ये मर पडली असुन त्याला विशेष राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला आहे.
येत्या १५ आँगस्टला तिरंगा फडकावण्याकरीता रोजी धिरज माऊंट एल्बुज मोहिमेवर जाणार आहे. अकोला जिल्ह्याच्या अकोट येथील एक हात व एक पाय नसलेल्या दिव्यांगाने ज्वालामुखीच्या उद्रेकातून तयार झालेले जगातील सर्वात उंच असे दक्षिण आफ्रिकेतील किलीमंजारो हे हिमशिखर प्रजासत्ताकदिनी २६ जानेवारी २०१६ रोजी सर केले.
आत्मविश्वास, जिद्द, चिकाटीव धाडसाच्या बळावर अनेक अडचणींचा सामना करीत धीरजने भारताचा तिरंगाध्वज व महाराष्ट्राच्याअस्मितेचा भगवा ध्वज ही प्रजासत्ताकदिनी फडकविला. आफ्रिका खंडातील किलीमंजारो हा सर्वात उंच पर्वत टान्झानिया देशातील ईशान्य भागातील केनियाच्या सीमेवर आहे. या शिखराची उंची १९ हजार ३४१ फूट म्हणजेच ५ हजार ८९५ मीटर आहे. धिरजच्या या साहसाची व अन्य विशेष बाबींची दखल घेऊन त्यांच्या विक्रमाची नोंद महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस् मध्ये करण्यात आली. त्यांला विशेष राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला आहे.
महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डसचे मुख्य सुनिल पाटील यांनी धिरजला प्रमाणपत्र दिले आहे. धीरज ने यापूर्वी सातपुडा व सह्याद्रीतील अनेक शिखर सर केल्याची नोंद त्याच्या नावावर आहे काही महिन्यापूर्वी त्याच्या नावाची नोंद इंडिया बुक मध्ये घेण्यात आली होती त्यानंतर आता महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये धीरज चे नाव नोंदविल्यामुळे अकोट च्या शिरपेचात मानाचा पुरा खोल आहे धीरज कळसाईत हा एका पायाने हाताने दिव्यांग असला तरी त्याच्यात आत्मविश्वास जिद्द संघर्षाच्या भक्कम बळ आहे माऊंट एव्हरेस्ट शिखरावर भारताचा तिरंगा फडकवण्याच्या त्याचा निर्धार व स्वप्न आहे परंतु यावेळेस या माऊंट एव्हरेस्ट शिखरावर जाण्यापूर्वी धीरज ला माऊंट एल्बुज हे शिखर सर करायचा आहे. याठिकाणी धीरज जाणार असून 15 ऑगस्ट रोजी भारताचा तिरंगा फडकवणार आहे. त्याकरीता आर्थिक मदतीची गरज असल्याचे धिरज म्हणाला.
चौकट…
माऊंट एल्बुज मोहिमेसाठी धिरज मदतीचे बळ
भारताचा तिरंगा स्वतंत्रदिनी फडकावण्या करीता येत्या 1 आॅगस्ट 2019 मध्ये माऊंट एल्बुज मोहिमेसाठी निघणार आहो. त्यासाठी येणारा खर्च खूप मोठा आहे, शारीरिक तंदुरुस्ती ची साथ आहे, पण गरज आहे अर्थसहाय्याची, आतापर्यत अनेकांनी मदत केली आहे, प्रवासाची तिकीट झाली व इतर मोहीम प्रस्तावाची नोंदणी झाली. पंरतु मोहीमेत आवश्यक साहीत्य खरेदीसाठी लागणारा अवाढव्य खर्च माझ्यासारख्खा दिव्यांग व्यक्तीच्या आवाक्या बाहेरचा असल्याने खारीचा वाटा म्हणुन देशभक्त साहस प्रेमी, दानशूर क्रीडाप्रेमी समाज बांधवानी आर्थिक मदत खरावी अशी अपेक्षा दिव्यांग धिरज कळसाईत यांने व्यक्त केली आहे.
या मदतीकरीता बँक खाते
Bank Name :Bank of India,Branch :akot
A/C No:965310110010467
IFSC Code : BkID0009653 अशी माहीती धिरजने दिला आहे.
अधिक वाचा : मुंडगाव येथील स्मशानभूमी परिसरात ग्रामपंचायत कडुन वृक्षारोपण
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola