अकोट (देवानंद खिरकर) : वाढत्या प्रदूषणामुळे वातावरणात मोठया प्रमाणात बदल होत असून, वृक्षारोपण व वृक्षसंवरधन मोठी गरज निर्माण झाली आहे. वृक्षारोपणासोबतच वृक्षसंवधन सुध्दा झाले पाहिजे व ही पुढील काळाची गरज आहे. मुंडगाव येथील सरपंच श्रावण भरक्षे व ग्रामसेवक शेंडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
दरवर्षी या आवारात वृक्षारोपण करून वृक्षसंवधन केल्या जाते. गत अनेक वर्षांपासून सरपंच श्रावण भरक्षे व ग्रामसेवक शेंडे यांच्या मार्गदर्शनात स्मशान भूमीच्या आवारात विविध ठिकाणी वृक्षारोपण करून परिसरात अधिकाधिक वृक्षांची लागवड करून सर्व सदस्य यांच्या सहकार्याने परिसर हरित ठेवण्यासाठी प्रयत्न केले जातात. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही स्मशान भूमी परिसरात सरपंच व ग्रामसेवक याच्यांहस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी उपसरपंच तुषार पाचकोर व सदस्य मुरली काळे, सुभाष सरकटे, रमेश रोठे, डाॅ नाथे, प्रल्हाद हाडोळे, शाहु वानखडे, सचिन सरकटे, विक्री वानखडे, सुमित सरकटे, तसेच कर्मचारी माणिक सरकटे, विलास इंगळे पञकार स्वप्निल सरकटे यांची उपस्थिती होती.
अधिक वाचा : श्रीहरीकोटा – चांद्रयान-२ चे आज उड्डाण
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola