अडगाव बु (दिपक रेळे)- अडगांव शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकर्यांना नवीन तंत्रज्ञान स्वतंत्रता करीता छेडलेल्या सविनय कायदेभंग आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या भुमी पुत्रांचा सोमवार दिनांक 22 जुलैला सचिवालय परीसरात जाहीर सत्कार आयोजित करण्यात आला आहे…. शेतकऱ्यांना नव तंत्रज्ञान खुले व्हावे याकरिताचे आंदोलनात शेतकरी नेते ललीत बहाळे यांचे नेतृत्वात अकोली जहांगीर येथे व लक्ष्मीकांत कौठकार यांचे नेतृत्वात अडगाव बु येथे सहभागी झाल्यावर ज्या भुमीपुत्रांवर शासनाने गुन्हे दाखल केलेत अशा अकोली जहांगीर व अडगाव बु येथील 16 भुमी पुत्रांचा नागरी सत्कार संध्याकाळी सात वाजता सचिवालय परीसरात होत आहे ….. सेंट्रल कृषक सेवा सहकारी सोसायटी चे अध्यक्ष मनोहरलाल फाफट यांचे अध्यक्षतेखाली होत असलेल्या या कार्यक्रमात माजी जि. प. सदस्य गोपाल कोल्हे, मनमोहन व्यास मा. पं स सदस्य गुलाबसिंग डाबेराव, माजी सरपंच अशोक घाटे, सरपंच रुख्मीनी मंगलसिंग डाबेराव, गणेश सोळंके, उपसरपंच महेबूबखॉ पठान, अफरोजखॉ पठाण हे प्रमुख अतिथी राहतील… शेतकऱ्यांना नव तंत्रज्ञान खुले करण्यासाठी लढणार्या भुमीपुत्रांच्या या जाहीर सत्कार समारंभाला परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन नागरी सत्कार समिती अडगाव बु – शिवाजी नगरच्या वतीने करण्यात आले आहे.