दानापूर (वा) सुनिलकुमार धुरडे : तेल्हारा तालुक्यातील क्रमांक 2 ची मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखले जाणारे दानापूर येथे प्रथमिक आरोग्य केंद्राची भव्य मोठी इमारत व परीसरातील रुग्णांच्या सेवेत हे आरोग्य केंद्र येथील कर्मचारी सेवा देत असत. मात्र आता हे प्राथमिक आरोग्य केंद्र याला अपवाद ठरले आहे.
गेल्या 8 तारखेला या प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी दारूच्या नशेत कर्तव्यवर येत असत व आरोग्य केंद्रात धीगाना घालत असत त्यामुळे तालुका आरोग्य अधिकारी तोरणेकर यांनी वैद्यकीय अधिकारी डॉ वेते यांच्या विरोधात हिवरखेड पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यामुळे येथिल डॉ वेते यांना आरोग्य केंद्र सोडून जावे लागले. या सर्व प्रकाराला जवळ जवळ एक आठवडा झाला तरी या ठिकाणी अजून पर्यंत दुसरे वैद्यकीय अधिकारी रूजू झाले नाहीत त्यामुळे येथील रुग्णांना मोठया समस्या झेलव्या लागत आहेत.
आज दानापूर प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली असता या ठिकाणी 5 कर्मचारी कर्तव्यवर हजर होते तर या आरोग्य केंद्रात हेड कार्टर ला ओ, पी, डी करण्यासाठी बाहेर आरोग्य केंद्राचे कर्मचारी बोलवावे लागतात. तर यामध्ये हिवताप कार्यालया मार्फत 4 आरोग्य सेवक पदे आहेत ही 4 ही पदे रिक्त आहेत, जिल्हा परिषद आरोग्य विभागातील 3 पैकी 1 आरोग्य सेवक भरलेले आहे. या आरोग्य केंद्रात एकूण 39 पदे आहेत पैकी 22 पदे भरली होतो मात्र या मधील फक्त 5 कर्मचारी या आरोग्य केंद्रात आहेत बाकी सर्व पदे ही रिक्त आहेत .
या आरोग्य केंद्राच्या अंतर्गत 32 गावे येतात यामध्ये 8 गावे ही आदिवासी भागातील आहेत यामध्ये नागरतास, भारुड खेडा चांदनपूर, मोहपाणी, इत्यादी गावे आहेत तर 7 उपकेंद्र ही या आरोग्य केंद्रात येतात व 42275 लोकांचा आरोग्याचा कारभार या आरोग्य केंद्राच्या मद्यमातून चालतो मात्र या ठिकाणी डॉ व कर्मचारी नसल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे .
त्यातच पावसाळ्यात आता साथीचे रोग, व इतर रोगांना रुणांना सामोरे जावे लागणार आहे. त्यातच या ठिकाणी स्वच्छता सेवक सुद्धा नाही त्यामुळे येथे घाणीचे साम्राज्य तयार झाले आहे.
औषध निर्माण अधिकारी च नाही दानापूर आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी सोबतच औषध निर्माण अधिकारी सुद्धा नाही त्यामुळे येथे येणाऱ्या रुग्णांना उपचार न करताच रिकामे परतावे लागत आहे.
ओप्रेरेशन थेटर झाले भंगारया आरोग्य केंद्रात आठवड्याला 10 च्या जवळ कुटुंब नियोजन चे ऑपरेशन केले जात होते मात्र आज रोजी येथे एकही रुग्ण नसून येथील ऑपरेशन थेटर हे भंगार झाले असून रुणांना लागणारी पुरेशी सुविधा ही अपुरी आहे.
त्यामुळे प्रशासनाने या आरोग्य केंद्रात रिक्त असलेली पदे लवकर भरावी व पुढील होणारी हानी टाळावी.
गेल्या आठवड्या पासून या आरोग्य केंद्रात डॉ नाहीत त्याच बरोबर येथे कर्मचारी सुद्धा अपुरे आहेत. त्यामुळे येथिल रुग्णाचे मोठे हाल होत आहेत तरी संबंधित विभागाने येथे रिक्त असलेली पदे लवकरात लवकर भरावी अन्यथा आम्ही उपोषणाला बसू.
रवींद्र तायडे (सामाजिक कार्यकर्ते) दानापूर.
अधिक वाचा : अकोला : अंध पती-पत्नी स्वाभिमानाने चालविताहेत आहेत चरितार्थ
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola