अकोला (प्रतिनिधी) : अंत्योदय अभियानाकरिता पात्र असलेला एकही व्यक्ती योजनेच्या लाभापासुन वंचित राहणार नाही यासाठी सर्वांनी सामाजिक बांधिलीकी म्हणून प्रयत्न करावे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात पंडीत दिनदयाल उपाध्याय अंत्योदय अभियानाची सुरूवात जिल्हाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, जिल्हा पुरवठा अधिकारी बी. यु. काळे, सहाय्यक पुरवठा अधिकारी राहुल वानखडे, यांची प्रमुख उपस्थिती होती.
पात्र कुटूंबाना 100 टक्के शिधा पत्रिका वाटप करणे तसेच शिधापत्रिकेमध्ये व्यक्तींचे नाव कमी किंवा पत्रिकेमध्ये दुरूस्ती करणे अन्न सुरक्षा योजनेमध्ये कुटूंबाचा समावेश करणे आदि कामांचा यात समावेश आहे. आर.सी.एम.एस. ऑनलाईन प्रणालीमध्ये समाविष्ट असणा-या प्रत्येक शिधापत्रिकांना 12 अंकी नंबर देणे. त्यांनुसार ई-पॉस मशिनव्दारे पात्र लाभार्थ्यांना अन्न धान्य वितरण करणे. तसेच केरोसीन पात्र कुटूंबाना 100 टक्के गॅस कनेक्श्न वाटप करणे आदी कामे या अभियानातंर्गत करण्यात येणार आहे. या सर्व कामाकरीता रास्त धान्य दुकानदारांचे सहकार्य लागणार आहे. 100 टक्के लाभार्थ्यांना लाभ देण्याचे मोठे काम याकालावधीत करण्यात येणार आहे. आपल्या गावातील अशिक्षीत, वृध्द व दुर्लक्षीत असलेल्या समाजातील शेवटच्या पात्र घटकांना शोधून त्यांना लाभ देण्यासाठी सर्व रास्त धान्य दुकानदारांनी सामाजीक बांधिलकी समजुन सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले.
पात्र कुटूंबाना 100 टक्के शिधा पत्रिका वाटप , 100 टक्के धान्य वाटप व केरोसिन पात्र कुटूंबाना 100 टक्के गॅस कनेक्शन वाटप यासाठी पंडित दिनदयाल उपाध्याय अंत्योदय अभियान दि. 15 जुलै ते 14 ऑगष्ट्र या दरम्यान पुर्ण महाराष्ट्रामध्ये राबविण्यात येणार आहे. या योजनेचा शुभारंभ जिल्हाधिकारी यांच्या हस्ते प्रातिनीधीक स्वरूपात शिधापत्रिका वाटप व उज्वला योजनेतंर्गत गॅस कनेक्शन वाटप करून करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा पुरवठा अधिकारी बी.यु.काळे यांनी तर उपस्थितांचे आभार अन्न धान्य वितरण अधिकारी रविंद्र यन्नावार यांनी केले. यावेळी अरविंद गॅस एजन्सी, अनुराग एजन्सी, मोहिनी गॅस एजन्सी, शर्मा गॅस एजन्सी व एमजी गॅस एजन्सीचे प्रतिनीधी, लाभार्थी उपस्थित होते.
अधिक वाचा : महावितरणमध्ये ७००० जागांसाठी मेगाभरती, अर्ज करण्यासाठी अखेरचे ७ दिवस
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola