बोर्डी (देवानंद खिरकर) : बोर्डी येथिल जितेंद्र आतकड यांच्या शेतातील 4 ब्रास जप्त असलेली रेति पैकी 2 ब्रास रेति स्पॉट वरुन चोरुन नेली होती. या बाबत तक्रार करण्यात आली होती.त्या तक्रार वरुन तहसीलदार यांच्या पत्राप्रमाने बोर्ड़ीचे तलाठी खामकर यांनी शेतकरी आतकड व पोलिस पाटिल प्रकाश उगले यांच्या समक्ष शेतात जाऊन पंचनामा केला होता.
2 ब्रास रेति चोरीला गेली असा अहवाल तहसीलदार यांचेकडे दाखल केला होता. येवढेच नव्हे तर तहसीलदार अकोट यांनी स्वताहा बोर्डी येथे येवुन रेति चोरी गेलेल्या स्पॉटची पाहणी सुधा केली होती. रेति चोरी जाण्यास कारणीभूत असलेले शेतकरी व ज्याच्या सुपूर्द नाम्यावर ती रेति सोडण्यात आली होती. असे बोर्ड़ीचे पोलिस पाटिल प्रकाश उगले यांच्या विरुध कारवाई करण्यात येईल असा अहवाल दि.20/6/2019 रोजी यस ड़ी ओ सर अकोट कडे अहवाल सादर केला होता.
त्याची एक प्रत अर्जदार यांना सुधा देण्यात आली होती. तरी सदर प्रकरना बाबत तहसीलदार यांनी दि.16/7/2019 रोजी सबंधीत शेतकरी आतकड यांना नोटिस बजावली होती. प्रकरण बंद करुन शेतकरी आतकड यांच्या शेतीच्या सातबारा वर 63332 रुपये सरकारी खजीन्याचा बोजा चढवन्याचा आदेश दिला आहे.
परंतू मात्र ज्यांच्या सुपूर्दनाम्यावर ती रेति सोडन्यात आलेली होती असे जबाबदार असलेले बोर्डीचे पोलिस पाटिल प्रकाश उगले यांच्यावर मात्र अध्यापही कुठलिही कारवाई करण्यात आली नाही. मात्र अकोट तहसीलदार यांनी एकावर दंडात्मक कारवाई केली तर दुसर्याला मात्र अभय दिले आहे.
वास्तविक पाहता जप्त केलेली रेति दंड न भरताच स्पॉट वरुन चोरुन सुधा नेली. या बाबत पोलिस पाटिल यांनी तहसीलदार अकोट यांना माहिती देने अपेक्षीत असतांना पोलिस पाटिल उगले यांनी कुठलिही माहिती तहसीलदार यांना दिलेली नाही. या बाबत फौजदारी कारवाई करने अपेक्षीत होते.
तहसीलदार अकोट यांनी अर्जदार यांना दोघानवरही फौजदारी कारवाई करतो असे तोंडी सांगितले होते. परंतू अध्यापही फौजदारी कारवाई करन्यात आलेली नाही. ही मात्र उल्लेखनिय बाब आहे. तरी वरिष्ठ अधिकारी यांनी दखल घेवून फौजदारी कारवाई करन्याचे आदेश द्यावे.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola